शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडब्ल्यूएस’ना भरतीत संधीच नाही; न्यायालयातील श्रेणी-३ ची पदभरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 08:11 IST

राज्यातील ३५ जिल्ह्यातील न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरू आहे.

राजेश सोळंकी

आर्वी (जि. वर्धा) : राज्यातील ३५ जिल्ह्यातील न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरू आहे. श्रेणी-३ करिता ५ हजार ७९३ जागांकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून १८ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. परंतु, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे प्रावधानच नसल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे.  

परंतु, सन २०१९ मध्ये भारतीय संघ परिषदेने मान्यता दिलेल्या १० टक्के आरक्षण असलेल्या, ८ लाख रुपयांपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या, एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गात नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल  प्रवर्गातील उमेदवारांसाठी पर्यायच दिलेला नाही. हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तोही बंद दाखवतो. आता अर्ज दाखल करण्यास मोजकाच अवधी राहिला असून अनेकांना या भरतीप्रक्रियेपासून मुकावे लागणार असल्याने रोष व्यक्त होत आहे.

उमेदवारांची संख्याही वाढली

बऱ्याच दिवसानंतर ही भरती होत असल्याने उमेदवारांचीही संख्या मोठी आहे. यात पोर्टलवर वर्गनिहाय एससी, एसटी, डीएनटीए, एनटीबी, सीडी, एसबीसी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज दाखल करता येतो.  

राज्य सरकारच्या इतर विभागाच्या जाहिरातीत ईडब्ल्यूएस आरक्षण असल्याचे दिसत आहे. परंतु, न्यायालयाच्या श्रेणी-३ पदभरतीत जातप्रवर्गामध्ये ईडब्ल्यूएस  प्रवर्गाचा उल्लेख केला नाही. यात दुरुस्ती करण्यात यावी.

- यशवंतसिंह चौहान,  उमेदवाराचे पालक