शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

वणा नदीचे पाणी देण्यास सर्वांचाच विरोध

By admin | Updated: May 1, 2015 23:57 IST

उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत.

पाणी पेटले : उत्तम गॅल्वा कंपनीने पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला दिली गतीहिंगणघाट : उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत. याउलट उत्तम गॅल्वा ने पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला गती दिली असल्याने वणेचे पाणी पेटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील वणा नदीतून भूगावच्या उत्तम गॅल्वा कंपनीला ८.७६ दलघमी पाणी उचलण्याची परवानगी २०१० मध्ये देण्यात आली. त्यावेळेस कोणत्याही हरकती न मागता पूर्व शासनाने सरळसरळ संमती देवून हा प्रश्न जनतेपासून अंधारात ठेवल्याचा आरोप केला जात असून वणेचे पाणी कंपनीला देण्यास सर्वत्र विरोध केला जात आहे. राज्य शासनाने ती परवानगी रद्द करावी. अशीच मागणी नगर सिधार समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांनाही देण्यात आल्या आहेत.(शहर प्रतिनिधी) जुना निर्णय रद्द करण्याची तालुकावासियांची मागणीमहात्मा फुले समता परिषदसार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली पाण्याची पाईपलाईन टाकण्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली.नगर विकास सुधार समितीनदीचे वाहते पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी आणि गुराढोरांसाठी संरक्षित करण्याची मागणी केली. नगर विकास सुधार समितीच्या वतीने करण्यात आली. जनसुनावणी न घेतात दिली परवानगीजनतेला विश्वासात न घेता करार करून शासनाने परवानगी देवून जनतेशी विश्वासघात केला. याबाबतची जनसुनावणी न करता ही परवानगी दिली गेली. नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिली असल्याने ती परवानगी रद्द करावी अशी मागाणी आम आदमी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी, विविध पक्षाच्या प्रमुखांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार मोहीम छेडली आहे. त्यामुळे दिलेली परवानगी रद्द करावी आणि सध्या कंपनीने पाईप लाईन टाकण्याचे सुरू केलेले कार्य थांबवावे, अशी ही मागणी होत आहे. हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा कमी पडल्यास न. प. लाखो रूपये खर्च करून पाटबंधारे विभागामार्फत पाणी विकत घेते. परिसरातील शेतीला व शहराला पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे वणा नदीतून भूगावच्या कंपनीला पाणी पुरवण्याची परवानगी देवू नये राजू तिमांडे, माजी आमदार, हिंगणघाटजनतेच्या दृष्टीने तो निर्णय अन्यायकारक असून मागील शासनाने हा निर्णय घेतलेला होता. यावर फेरविचार करून जुना निर्णय रद्द करावा. न.प.चा अध्यक्ष म्हणून माझा पाणी देण्यास पूर्ण विरोध आहे. पाण्याची सदर परवानगी लवकरात लवकर रद्द करावी, पंढरीनाथ कापसे, नगराध्यक्ष, नगरपालिका हिंगणघाटवणा नदी या भागासाठी जीवनदायिनी असून तालुक्यातील नागरिकांना ती पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते. नदी किनाऱ्यावरील अनेक गावांचा पाणी पुरवठा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाची गरज नदी पूर्ण करते. रोजगार निर्मिती करण्यासाठी स्थानिक उद्योगाची गरज असून त्यासाठी पाणी आवश्यक आहे. उन्हाळ्यात नदीला फार कमी पाणी असते. नेमकी त्याच वेळेस पाण्याची मागणी वाढते. येथेच पाणी उन्हाळ्यात अपुरे पडत असल्याने येथून पाणी आम्ही कंपनीला जावू देणार नाही. याप्रकरणीचौकशी सुरू असून ही परवानगी फार पूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने दिली असून ती रद्द करावी.आ. समीर कुणावार, हिंगणघाट