शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

सरणानंतरची धग कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

अमानवीय घटना नंदोरी मार्गावर घडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हापासून जिल्ह्यातच नव्हे, तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सात दिवस पीडितेची नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती पण; यात सोमवारी सकाळी ‘ती’ अपयशी ठरली. तिच्या मृत्यूचे वृत्त धडकताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.

ठळक मुद्देसकाळपासूनच संताप, आक्रोशाचा भडका : अंत्यसंस्कारासाठी उसळला पंचक्रोशीतील जनसागर

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आठवडाभरापूर्वीच्या सोमवारी सकाळी ७.३० वाजता प्राध्यापिकेवर पेट्रोल हल्ला करून जाळण्याची अमानवीय घटना नंदोरी मार्गावर घडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हापासून जिल्ह्यातच नव्हे, तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सात दिवस पीडितेची नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती पण; यात सोमवारी सकाळी ‘ती’ अपयशी ठरली. तिच्या मृत्यूचे वृत्त धडकताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.तालुक्यातील एका लहानशा गावातील प्राध्यापिकेवर हिंगणघाट शहरातील नंदोरी मार्गावर पेट्रोल हल्ला करण्यात आला होता. ३ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर संताप व आक्रोश कायमच होता. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. याची कल्पना पोलीस प्रशासनाला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या नेतृत्वात दंगल नियंत्रक पथकासह ३०० पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीसुद्धा गावात दाखल झाले. सकाळी १० वाजतापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता असतानाच अचानक भडका उडाला. गावातील महिला, तरुणी, युवक व ज्येष्ठ नागरिक अचानक रस्त्यावर उतरले. गावालगत असलेल्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी ठाण मांडून दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली.‘त्या हत्याऱ्याला आमच्या हवाली करा, त्याशिवाय शववाहिका गावात जाऊ देणार नाही आणि अंत्यसंस्कारही होऊ देणार नाही’ अशी भूमिका घेतली. नागरिकांचा संताप व आक्रोश पाहून महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूंनी दूरवरच वाहने थांबविण्यात आली होती. जवळपास अडीच तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला. दुपारी १.१३ वाजता पीडितेची आई, वडील व नातलग पार्थिव घेऊन रुग्णवाहिकेने गावात दाखल झाले. खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार त्यांच्या सोबत होते. संतप्त जमावाने त्यांची वाहने रोखून धरली. यादरम्यान काहींनी तुफान दगडफेकही केली. यावेळी पीडितेचे वडील, खा. रामदास तडस व आ. समीर कुणावार हे रुग्णवाहिकेच्या मागे पायदळ चालत असल्याने ते या दगडफेकीतून थोडक्यात बचावले. यात रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्याने लगेच पोलिसांनी रुग्णवाहिकेला गराडा घातला. जमाव वाढतच गेल्याने नाईलाजास्तव पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रुग्णवाहिकेचा चालक व काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. तरीही त्यांनी पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका सुरक्षित पीडितेच्या घरापर्यंत पोहोचविली. त्यानंतरही बराच काळ घोषणाबाजी व तणावाचे वातावरण कायमच होते. या संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलीस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते.जळगावला अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पीडितेचा भाऊ दुपारी चार वाजता गावी पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. स्थानिक मोक्षधामात तिच्या पार्थिवावर सायंकाळी ५.८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा.रामदास तडस, आ. समीर कुणावार, किशोर दिघे, जि.प. सभापती माधव चंदनखेडे, माजी पं.स. सभापती लता घवघवे, सरपंच गिरीधर सिडाम, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, तहसीलदार श्रीराम मुंधडा, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे तुषार देवढे, चंदू मावळे, संजय डेहणे, डॉ. विजय पर्बत, वामनराव खोडे, आकाश घवघवे, मिलिंद भेंडे, बालू महाजन, मंदा ठवरी, अनिल भोंगाडे, माजी सरपंच राहुल घवघवे, रूपेश लाजूरकर, राहुल घवघवे, संदीप झाडे, नाना घोडे, सुनील इंगोले, वडनेरचे ठाणेदार गजबे, पोलीस पाटील काबंळे, सागर लाजूरकर, संजय तोडावत, बालू फटिंग, रा. म. धोटे, प्रा. उल्हास लोहकरे, गुरुदेव चौधरी, गजानन निवल, गजानन बुरांडे, प्रवीण चौधरी, विठ्ठल चौधरी, विवेक देशमुख, ईश्वर कोल्हे, अनिल देशमुख, संजय खातदेव, समीर पावडे यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शोकसभा घेऊन साश्रूनयनांनी तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.