शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

डोळे बंद असतानाही तिचा डोळसपणा कौतुकास्पद

By admin | Updated: December 11, 2014 23:11 IST

‘ती’ दिसायला अगदी निरागस, गोड अन् खट्याळ, वय अवघे पाच वर्षे; पण डोळ्याला पट्टी बांधून स्पर्श, गंधावरून रंग, आकडे, वस्तू ओळखण्याची किमया ती सहज साध्य करून दाखविते. पाहताना ही कुठली ट्रिक असावी

‘ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन टेक्निक’ : ४० वर्षांपासून सुरू होते संशोधनपराग मगर - वर्धा‘ती’ दिसायला अगदी निरागस, गोड अन् खट्याळ, वय अवघे पाच वर्षे; पण डोळ्याला पट्टी बांधून स्पर्श, गंधावरून रंग, आकडे, वस्तू ओळखण्याची किमया ती सहज साध्य करून दाखविते. पाहताना ही कुठली ट्रिक असावी वा काही उपजत शक्ती तिच्याजवळ आहे का, असाही भास होतो; पण वास्तविक विशिष्ट प्रशिक्षणाद्वारे ही किमया साध्य करता येते़ ५ ते १५ वर्षांपर्यंतची मुले अवघ्या काही काळात ते सहजरित्या अवगत करू शकतात.अरशा आनंद सराफ, असे या पाच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे, जीने प्रशिक्षणाद्वारे ही किमया अवघ्या दोन ते तीन दिवसांत साध्य केली आहे़ मानसशास्त्रात बरेच संशोधन झाले आहे. दररोज यात भर पडत आहे. मानसशास्त्रीय संशोधनानुसार आपण आपल्या बुद्धीचा केवळ एक टक्का उपयोग दैनंदिन जीवनात करतो; पण विशिष्ट प्रशिक्षणाद्वारे, साधना व एकाग्रतेच्या बळावर हा वापर वाढविता येतो़ एरव्ही डोळस असताना बरेचदा काही गोष्टी ओळखण्यात आपण गल्लत करतो; पण या प्रशिक्षणाद्वारे व मन एकाग्र करून डोळे बंद असतानाही हवी ती गोष्ट ओळखता येते़ या प्रशिक्षणास ‘ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन टेक्निक’, असे संबोधले जाते. ही मुख्यत: ‘जॅपनिज’ ‘टेक्निक’ असून ४० वर्षांपासून त्यावर संशोधन सुरू आहे. दीर्घ संशोधनानंतर या काही वर्षांत त्याचे रितसर प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रशिक्षिका कविता सराफ सांगतात. अरशा ही पाच वर्षांची असून ती पहिल्या वर्गात आहे; पण ‘ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन’मुळे केवळ स्पर्शाच्या जोरावर डोळ्याला पट्टी बांधत विविध रंगांचे चेंडू ती अचुक सांगते. दिलेल्या नोटेवरील क्रमांक, पत्त्यांवरील क्रमांक ती सहज न पाहता वाचते़ सांगितलेल्या रंगाची रंगकांडी अचुक ओळखून डोळ्याला पट्टी असताना ती चित्रात कोरीव रंग भरते. बुद्धीमत्ता वाढण्यास मदतटीव्हीवर विविध कार्यक्रमांत डोळ्यांना पट्टी बांधून करामाती करणारे खेळ पाहतो़ त्यातील अनेक बाबी सरावाने शिकता येत असल्या तरी केव्हाही व कधीही डोळ्याला पट्टी बांधून कुठलीही गोष्ट ओळखणे सहज नाही. या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश केवळ मनोरंजन नसून बुद्धीमत्ता वाढविणे असल्याचे कविता सांगतात. कमीवेळेत कुठलीही गोष्ट आत्मसात करण्याची हातोटी प्राप्त होत चिरकाळ स्मरणात राहण्यासाठी उपयोग होतो.