लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: तालुक्यातील आंजी मोठी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पासून आपल्या न्यायिक मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांच्या दबावात येऊन अतिक्रमणधारकांना घर खाली करण्याची धमकी देत असून या प्रकरणी अतिक्रमण धारकांची बाजू जाणून घेत योग्य कार्यवाही करण्यात यावी. शिवाय लेखी आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकार्त्यांची आहे.
वर्ध्यातील अतिक्रमणधारकांचा जि.प. सीइओच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:23 IST