शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

४० दुकानदारांवर रोजगाराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाचे काम : पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सदर रस्ता काम करण्याची भूमिका महामार्ग बांधणी प्रशासनाने घेतली असल्याने हे दुकानदार अडचणीत आले आहे.खडकी येथे मागील २५ वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरात हॉटेल, चहा टपरी, पानठेला व विविध लहान दुकाने लावून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह ४० लोक करीत होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ बुट्टीबोरी ते औरंगाबाद रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या परिसरातील हे दुकान हटविले जाणार आहे. सदर दुकाने हे शेतजमिनीच्या जागेवर शेतमालकांकडून भाडेतत्वावर जागा घेवून चालविण्यात येत होते. या शेताच्या जागेचा मोबदला शेतमालकाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. मात्र गेल्या २५ वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या या लोकांना कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. आमचे पुनर्वसन गावठाणाच्या जागेवर करून द्या, अशी मागणी या व्यवसायिकांनी केली आहे. ग्रामपंचायत खडकी आमगावच्या सरपंच व सचिवाकडे याबाबत निवेदनही ४० व्यवसायिकांनी दिलेले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महामार्गाचे काम होणार असल्याने आमच्या पोटापाण्याचा व्यवसाय जाणार आहे, त्यामुळे आम्हाला खडकी आमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंदिरसमोरील उत्तरेकडील शेत सर्व्हे नं. १३/१ या ठिकाणी गावठाणावर पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीने ठराव करून पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु याबाबत काहीही हालचाल करण्यात आलेली नाही, अशी माहिती या व्यवसायिकांनी दिली.आमदारांनी दिले नितीन गडकरींना पत्रबुट्टीबोरी ते औरंगाबाद या महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने खडकी येथील व्यवसायिकांचा व्यवसाय बंद होणार आहे. त्यामुळे या नागरिकांना रस्त्याच्या दक्षिणेकडील शेतात गावठाण व व्यवसायाकरिता जागा देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देवून केली आहे.आमच्या वडिलोपार्जीत जागेवर ४० वर्षांपासून व्यवसाय करण्यात येत आहे. यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. सदर व्यवसाय हा रस्त्यालगत असल्याने तो रस्त्याच्या कामामुळे बंद होणार आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे पुनर्वसन करून देण्यात यावे.- इकबाल खान, व्यावसायिक, खडकी-आमगाव.

टॅग्स :TempleमंदिरNational Highwayराष्ट्रीय महामार्ग