शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात कोविड मृत्यू नियंत्रणासाठी चाचणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:45 IST

वर्धा जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२२ हजार ५२३ चाचण्या२१ हजार ४६० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाली असून कोविड मृत्यू नियंत्रणासाठी कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन या दोन पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या कोविड चाचणी केलेल्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे.

शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळता येतो, हे लक्षात आल्यावर आरोग्य विभाग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अ‍ॅन्टिजेन किटद्वारे ६ हजार १२१ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८१ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह तर ५ हजार ८४० व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर १६ हजार ४०२ व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच १५ हजार ६२० व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस