शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आठ आदर्श शाळा; बांधकाम मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:22 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढविण्याकरिता ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम शासनाने हाती घेतला. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा शासनस्तरावर निवडण्यात आली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आठ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांच्या विकासाकरिता दोन टप्प्यांत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याकरिता इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत याही शाळा आदर्श बनविण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा निवडून आठ शाळा आदर्श बनविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. पण, गेल्या एक ते दीड वर्षापासून या आदर्श शाळेतील बांधकामाला सुरुवात झाली नसल्याने शिक्षण विभाग हा मुहूर्त कधी साधणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढविण्याकरिता ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम शासनाने हाती घेतला. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा शासनस्तरावर निवडण्यात आली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आठ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांच्या विकासाकरिता दोन टप्प्यांत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात छोटी बांधकामे, दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे करण्यासाठी जिल्ह्याला २ कोटी ११ लाख ६७ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच मोठ्या बांधकामाकरिता आणि सर्वा सोयी-सुविधांची पूर्तता करण्याकरिता एका शाळेला जवळपास १ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी २ कोटी ५२ लाखांचा निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. परंतु आदर्श शाळा निश्चित होऊन आता साधारणत: एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अजून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या आठ शाळांचे रूपडे कधी पालटणार आणि गुणवत्ता कधी सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदर्श शाळेत काय सुविधा राहणार?या शाळेतील इमारत, वर्गखोली आणि सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. यासोबतच मुलं-मुली आणि दिव्यांगांकरिता स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, किचन शेड, खेळणीची उपलब्धता, ग्रंथालय, संगणक कक्ष, हात धुण्याचे केंद्र, विद्युतीकरण आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा आदर्श करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला लहान बांधकामाकरिता २ कोटी ११ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. बांधकाम विभागाने या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवात होईल. त्यानंतर लवकरच मोठ्या कामांचीही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

लहान बांधकामाच्या निविदा झाल्या -  जिल्हा परिषदेच्या आठ शाळा आदर्श करण्याकरिता लहान बांधकामे आणि मोठी बांधकामे अशा दोन टप्प्यांत निधी मंजूर करण्यात आला आहे. आठही शाळांमध्ये लहान बांधकामाकरिता २ कोटी ११ लाख ७६ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. तर मोठ्या बांधकामाकरिता सरासरी प्रत्येक शाळेला १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी २ कोटी ५२ लाख प्राप्त झाले आहे, परंतु आता केवळ लहान बांधकामाचीच निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मोठ्या कामांच्या निविदांचा अजून पत्ता नाही.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळा