शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या ‘ड्रीम’ प्रोजेक्टचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:24 IST

शहरातील गोळा होणारा कचरा साठविण्यासाठी बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. येथे पालिकेने जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला. सध्या हा प्रकल्प निविदाप्रक्रियेतून कंत्राटदाराला दिला असून या प्रकल्पात दररोज गोळा होणाऱ्या १६ ते १७ टन कचऱ्यासून दीड टन खताची निर्मिती केली जाते.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग : सात तासानंतर आग आटोक्यात, ८० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या इंझापूर शिवारातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत प्रकल्पातील मशीन, वेस्ट प्लास्टिक, शेडचा काही भाग जळाल्याने ७० ते ८० लाख रुपयाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिसरात कचरा व खत असल्याने आग चांगलीच धुमसली होती. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.शहरातील गोळा होणारा कचरा साठविण्यासाठी बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. येथे पालिकेने जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला. सध्या हा प्रकल्प निविदाप्रक्रियेतून कंत्राटदाराला दिला असून या प्रकल्पात दररोज गोळा होणाऱ्या १६ ते १७ टन कचऱ्यासून दीड टन खताची निर्मिती केली जाते. या प्रकल्पामध्ये खत निर्मितीकरिता विविध मशीन लावण्यात आल्या आहे. या प्रकल्पाने जोर पडकला असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक या केंद्रात आगीचा भडका उडाला. आग लागल्याची माहिती बोरगाव व इंझापूरातील काही नागरिकांनी पालिकेच्या नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांना दिली. लागलीच पहाटे साडेचार वाजता पालिकेचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, स्वीकृत नगरसेवक जयंत सालोडकर, पालिकेचे कर्मचारी अशोक ठाकूर व आरोग्य सभापती अहूजा यांच्यासह इतरांनीही प्रकल्पाकडे धाव घेतली.आगीचे रौद्ररुप धारण केल्याने तात्काळ वर्धा नरगपालिका, देवळी नगरपालिका व उत्तम गल्वा कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. याची माहिती महाविरतणलाही देण्यात आली.महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळासह परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला. जवळपास १८ ते १९ बंब पाण्याचा मारा केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या भीषण आगीत प्रकल्पातील बेलिंग मशीन, सेक्रेनिंग मशीन आणि दोन ग्रेडर मशीन जळाल्या. यासोबतच ओला आणि सुका साठविणाऱ्या शेडचाही काही भाग जळाल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी पोलिसांत कुठलीही तक्रार झालेली नसल्याचे सांगण्यात आले.विदर्भातील एकमेव प्रकल्पवर्ध्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या भरवशावरच पालिकेला आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून २३ कोटी रुपयाचे बक्षीस मिळवून दिले आहे. यासोबतच राज्यातील पहिला पाच पालिकांमध्ये वर्धा नगरपालिकेचा समावेशही याच प्रकल्पामुळे झाला आहे. सतत तीन वर्ष ४ कोटी, ६ कोटी व १३ कोटीचे बक्षीस मिळविणारी वर्धा नगरपालिका ही विदर्भातील एकमेव ठरली आहे. अशा या महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आज आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.मुख्याधिकाºयांकडून ‘नो रिस्पॉन्स’पालिकेचा महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला रविवारी पहाटे आग लागली. याची अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता दुपारी पालिकेचे मुख्याधिकारी जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ऐरवीही काही माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर ते प्रतिसाद देत नाही. त्यामुळे माहिती जाणून घेण्यास अडथळा निर्माण होतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाfireआग