शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

वर्षभरात ७१ हजार ५०० लिटर दूध केले रिफ्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:01 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दूध खरेदी करण्यास नकारघंटा वाजवित आहे. मागील वर्षी तब्बल ७१ हजार ५०० लीटर दुध स्वीकारले नसल्याने दूध व्यवसायिकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देउत्पादक अडचणीत : शासकीय दूध योजनेचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दूध खरेदी करण्यास नकारघंटा वाजवित आहे. मागील वर्षी तब्बल ७१ हजार ५०० लीटर दुध स्वीकारले नसल्याने दूध व्यवसायिकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली आहे.जिल्ह्यातील २५६ दूध सोसायट्या आहे. कमीतकमी २ हजार दूध उत्पादक आहे. ११ ते १२ मार्गावरुन वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघ दूध गोळा करतात. हे सर्व दूध मागील ३० ते ४० वर्षांपासून शासकीय दूध योजनेला पुरवितात. मागील तीन वर्षापासून गुणनियंत्रक अधिकारीच दूधशाळा व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळीत असल्याने या कालावधीत जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मोठी पिळवणूक सुरुअसल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यातील दूध चांगल्या प्रतीचे असताना काही ठराविक संस्थेचेच दूध गुणप्रतीत लागत असून इतर सर्व दूध हे निकृष्ट व कमीप्रतीचे असल्याचे सांगून स्वीकारले जात नाही. त्यामुळे ते कमी दरात विकावे लागतात, असाही आरोप होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना दूध व्यवसायाकडे वळवून दूधाचे उत्पादन वाढविण्यास मदत केली जाते. तर दुसरीकडे दुधाचे उत्पादन वाढल्यास ते खरेदी न करता परत पाठविण्याचा प्रताप शासकीय दूध योजनेने चालविल्याने दूध उत्पादकांनी आता व्यवसायापासून फारकत घेतली आहे.प्रतिदिन ४ हजार लिटरने दूध संकलन घटलेमागील वर्षी जून २०१८ मध्ये संपूर्ण जिल्ह्याचे दूध संकलन ३ लाख ९ हजार ८०१ म्हणजेच प्रतिदिन १० हजार २३७ लीटर होते. परंतु, शासकीय दूध योजनेच्या मनमानी कारभारामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम झाला. यावर्षी जून महिन्यात केवळ १ लाख ९४ हजार ३६९ म्हणजेच प्रतिदिन ६ हजार ४७८ एवढेच दूध संघाकडे आहे. ही तफावत फक्त जून महिन्यातीलच असून मागील वर्षभरात ७१ हजार ५०० लीटर दूध शासकीय योजनेने या ना त्या निकषात बसत नसल्याचे कारण देऊन परत केले. परिणामी दूध उत्पादक आर्थिक अडचणीत आले असून शासनाने दूध व्यवसायावर दिलेली भर येथे निरर्थक ठरत आहे.प्रोटीनचे निकष लावले जातातजिल्ह्यातील दूध हे वितरण व्यवस्थेकरिता न वापरत ईटकळ येथे खाजगी पावडर प्रकल्पाला पुरविल्या जाते. त्यामुळे पावडर तयार करताना प्रोटीनच्या निकषात बसत नाही. म्हणून वर्धा दूध संघाने शासकीय योजनेला पुरवठा केलेले दूध परत केले जात आहे. ३ जुलै रोजी शासकीय दूध योजनेला ६ हजार ३६७ लीटर दूध पुरवठा केला असता त्यापैकी ३ हजार ७९० लीटर दूध स्वीकारले असून २ हजार ५७७ लीटर दूध प्रोटीन कमीप्रतीचे असल्याचे सांगून परत केले. शासकीय दूध योजनेच्या या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.जिल्ह्यातील दूध उत्तम दर्जाचे असतानाही प्रोटीनच्या निकषात बसत नसल्याचे कारण देऊन दूध परत केले जात आहे. यामुळे शेतकºयांसह दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकताच दूध खरेदीची मर्यादा वाढविण्यात आल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला खरा पण, प्रोटीनच्या निकषात दूध उत्पादकांचे कंबरडे मोडत आहे. याबाबत वारंवार सूचना करुनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकºयांची अवस्था लक्षात घेत ही अट शिथिल करावी.- सुनील राऊत, अध्यक्ष, जिल्हा दुध उत्पादक संघ.