शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कचऱ्यामुळे वस्तीला डम्पिंग यार्डचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:33 IST

नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे.

ठळक मुद्देनागरिक दुर्गंधीने बेजार : स्वच्छ हिंगणघाटचा बोजवारा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

हेमंत चंदनखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. या कचºयाच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.सध्या शहरातील कचरा विकास शाळेजवळ टाकला जात आहे. कचरा टाकण्याचा प्रकार नित्याचा असल्याने येथे कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट गुरे फिरत असून त्यांच्या माध्यमातून कचरा इतरत्र पसरत आहे. नगर परिषदेची या डम्पिंग यार्डला मान्यता नसल्याची माहिती आहे. असे असले तरी शहरातील लोकांनी प्लास्टिक कचरा, सडक्या वस्तू, मेलेली जनावरे, शेण, ओला-सुखा कचरा पोत्यात भरून जुन्या व बंद असलेल्या पडक्या विकास शाळेच्या जागेत सर्रास टाकणे सुरू केले आहे. ते मैदान पूर्णत: कचऱ्याने भरले गेले असून तेथील हलका कचरा प्लास्टिक सारख्या वस्तू हवेने रस्त्यावर येत आहे. काही कचरा जनावरांनी पसरविल्यानेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त पसरलेला आहे.या कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी बाहेर पडत असल्याने त्या रस्त्यावरून जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. याच परिसरात शहरातील एक मोठे हनुमान मंदिर आहे. तेथे भाविकांची गर्दी असते. या नागरिकांना या कचºयाच्या ढिगाऱ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय लागूनच असलेल्या वसंत विहार आणि विनोद भवन परिसरातील नागरिकांचे या दुर्गंधीमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक समस्या भेडसावत असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. असे असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेने ही समस्या गांभीर्याने घेण्याची मागणी आहे.स्वच्छता अभियानातच वाढला कचराशासनाच्या सूचनेनुसार ‘स्वच्छ अभियान’ शहरभर पाळल्या गेले. या अभियानाचा शेवट झाला तरी हा भाग यातून सुटला असल्याचेच दिसत आहे. उलट या अभियानाच्या काळात या भागात कचरा अधिकच वाढल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. कुणीही यावं आणि येथे कचरा टाकून मोकळे व्हावे, असा प्रकार सध्या येथे सुरू आहे. लगतच्या परिसरातील अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानातील कचरा पोत्यात जमा करून येथे टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी असल्यामुळे अनेकांनी हा एक जवळचा मार्ग शोधला असल्याचे दिसून येत आहे; पण याचा त्रास येथील नागरिकांना होतो, याचा विचार कुणीही करण्यास तयार नाही. या प्रकारामुळे विनोद भवन आणि वसंत विहारातील रहिवासी शहराचे नागरिक नाहीत काय, असाही सवालही उपस्थित करण्यात येत आहे.आठवड्यातून दोन वेळाच येते घंटागाडीशहरातील ही एक मोठी लोकवस्ती आहे. यामुळे येथील नागरिकांना सेवा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना या भागात आठवड्यातून केवळ दोनच दिवस घंटागाडी येत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. यातून पालिकेच्या स्वच्छता अभियानाची मर्यादा स्पष्ट होते. एकीकडे स्वच्छता अभियानाचा जोरदार वाजागाजा केला जात असताना दुसरीकडे असा कचऱ्याचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभा होत आहे. प्लास्टिक बंदी असताना सर्वत्र प्लास्टिकचा कचरा दिसतो. यामुळे पालिकेच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :dumpingकचरा