शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:31 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देकालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.महामार्गाकरिता जड वाहनांची शेतशिवारातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ये-जा वाढली आहे. सद्यस्थितीत समृद्धी महामार्गाचे सूरगाव परिसरात काम सुरू आहे. या मार्गाकरिता लागणारा मुरूम झडशी येथील मौजा गिरोली परिसरातील शेती विकत घेत मुरूम ट्रकद्वारे नेण्याचे काम जोरात सुरू आहे. मुरूम वाहतूक येळाकेळी फाटा ते बाभूळगाव मार्गे डांबर मार्गाने न करता हिवरा शेतशिवारातून होत आहे. मदन उन्नई डावा मुख्य रस्ता पाटबंधारेच्या कर्मचारी व शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी निर्माण केला आहे.महामार्गाच्या कामावरील ट्रक येथून धावत असल्याने रस्ता दोन्ही बाजूने संपूर्णपणे दबला आहे. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट अडचणीत आली आहे.सध्या शेतीकामे सुरू असून शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य अक्षरश: डोक्यावर वाहून न्यावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. या दरम्यान मार्गाने जाणाऱ्या ट्रकमुळे उडणारी धूळ रस्त्यालगत असणाऱ्या पिकावर बसत होती. यामुळे अनेक पिके खराब झाली, शिवाय कालव्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता कालव्यावरून सर्रास जड वाहनांचे आवागमन सुरू आहे. त्यामुळे नुकसानभरपाई कोण देणार, संबंधित अधिकारी गप्प का असा प्रश्न शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत या सर्व प्रकाराला तत्काळ आळा घालावा, अशी मागणी झडशी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार; शेतकऱ्यांना मनस्तापशेतशिवारातील रस्त्याची दैना झाल्याने शेतकऱ्यांना बैलबंडी रस्त्यावरच उभी करून खत व शेतीपयोगी साहित्य डोक्यावर दूरपर्यंत वाहून न्यावे लागत आहे. केवळ कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.गौणखनिज घेऊन जाणाऱ्या वाहनांची ये-जा बंद करण्यास सांगितले असता कंत्राटदाराने कालव्यावर मुरूम टाकून देतो, असे सांगितले. काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. त्यामुळेच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागेल.- ए. राऊत, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, मदन उन्नई, वर्धा.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग