शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदी खोलीकरणामुळे शेताकडे जाणारे रस्ते झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याकरिता नदीवर कोल्हापुरी बंधारा निर्माण करून गावकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देशेती पडीक राहण्याची वेळ : नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याकरिता नदीवर कोल्हापुरी बंधारा निर्माण करून गावकऱ्यांच्या रस्त्याची समस्या मार्गी काढावी अशी मागणी सरपंच घनश्याम कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दिघी (बोपापूर) येथील यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे पात्रातील भूभाग खोल गेल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी राहत असल्याने नदी ओलांडून पलीकडे जाणे जीवावर बेतणारे ठरले आहे. त्यामुळे नदीपलीकडे असणारी शेती कशी करावी या विवंचनेत या भागातील शेतकरी आहेत.खोलीकरणामुळे शेताकडे जाणारे पूर्ण रस्ते बंद झाले आहे. गावाला लागून बजाज फाऊंडेशनच्यावतीने नदीच्या पात्रात मातीकाम करून तात्पुरती रस्ता केला आहे. परंतु हा रस्ता सुद्धा वाहून गेल्याने पात्रात दलदल निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना शेती करावयाची असल्यास जवळच असलेल्या नदीच्या पुलावरून आठ किमी जाणे व येणे असा १६ किमीचा फेरा पडत आहे. नदी खोलीकरणामुळे शेतीला पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याठिकाणी कोल्हापुरी बंधारा बाधून जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :riverनदीDeoliदेवळी