शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य कारभारामुळे परीक्षेतील सावळागोंधळ रविवारीही राहिला कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून तब्बल ६ हजार ९३० परीक्षार्थी आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा देणार असल्याने त्यासाठीची संपूर्ण तयारी शनिवारीच सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आली असली तरी कुठल्या केंद्रावर किती परीक्षार्थी उपस्थित तर किती गैरहजर राहिले याची माहिती परीक्षा सुरू झाल्यावर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडे वेळीच येणे अपेक्षित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत जिल्ह्यातील तब्बल २५ केंद्रांवरून घेण्यात आली. जिल्ह्यातील पंचवीसही केंद्रांवरून परीक्षा शांततेत पार पडली असली तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात परीक्षेचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षालाच रविवारी नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली याची माहितीच दुपारी ४.३० वाजेपर्यंत नव्हती. त्यामुळे नियोजनशून्य कारभारामुळे परीक्षेतील सावळा गाेंधळ कायम राहिला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून तब्बल ६ हजार ९३० परीक्षार्थी आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा देणार असल्याने त्यासाठीची संपूर्ण तयारी शनिवारीच सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आली असली तरी कुठल्या केंद्रावर किती परीक्षार्थी उपस्थित तर किती गैरहजर राहिले याची माहिती परीक्षा सुरू झाल्यावर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडे वेळीच येणे अपेक्षित होते. परंतु, परीक्षा संपून अर्धा तास होऊनही सदरची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियंत्रण कक्षाकडे नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची वर्धा जिल्ह्यात पारदर्शी परीक्षा पार पाडून घेण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अनेक तरुण-तरुणींची परीक्षेकडे पाठ-    जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून आरोग्य विभागाची परीक्षा शांततेत पार पडली असली तरी या परीक्षेला अनेक परीक्षार्थ्यांनी पाठ दाखविण्यातच धन्यता मानली. नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली तसेच किती परीक्षार्थी गैरहजर राहिले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांशी त्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधला असता त्यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियंत्रण कक्षाकडे दुपारी ४.३० वाजेपर्यंत सदर माहिती आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

२६ दिव्यांगांचा होता समावेश-    २६ केंद्रांवरून गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा देणाऱ्यांमध्ये २६ दिव्यांगांचा समावेश होता. पण रविवारी यापैकी नेमक्या किती दिव्यांग बांधवांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली याचीही माहिती दुपारी ४.३० पर्यंत नियंत्रण कक्षाकडे नव्हती.

वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली याची माहिती अद्याप आपल्याला प्राप्त झालेली नाही. सदर माहिती ठेवण्यासह पारदर्शी परीक्षा पार पडावी याची जबाबदारी सीएसवर आहे.- संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर.

 

टॅग्स :examपरीक्षाHealthआरोग्य