शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडची विविध शेतमाल खरेदीची पद्धत सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:37 IST

नाफेडच्यावतीने होत असलेली शेतमालाची खरेदी समजण्यापलीकडे आणि सदोष पद्धतीवर आधारीत आहे. तालुकास्तरावरील केंद्रावर एकदा मालाची गुणवत्ता तपासल्यानंतर पुन्हा विभागीयस्तरावर शेतमालाची तपासणी केली जाते.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी मेळावा व विकास कामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नाफेडच्यावतीने होत असलेली शेतमालाची खरेदी समजण्यापलीकडे आणि सदोष पद्धतीवर आधारीत आहे. तालुकास्तरावरील केंद्रावर एकदा मालाची गुणवत्ता तपासल्यानंतर पुन्हा विभागीयस्तरावर शेतमालाची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास विलंब होत आहे. या पद्धतीत सुधारणा करून न्यायाची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत आ. रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित शेतकरी मेळावा व विकास कामांचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते देवळी बाजार समितीच्या आवारात ६६ लाखांच्या निधीतून तयार करण्यात येत असलेल्या कार्यालय इमारतीच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तर ५० मे.टन भुईकाट्याचे लोकार्पण करण्यात आले.आ. कांबळे पुढे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून शेतकºयांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने व व्यापाºयांकडून शेतकरी नाडवल्या जात असल्याचे दिसून येते. यावर वेळीच योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.हिंगणघाट बाजार समितीनंतर देवळी बाजार समितीने कापसाचे खरेदीत उच्चांक गाठला आहे. येथील संचालक मंडळाने परिश्रमातून व्यवसायाला गती द्यावी. या बाजाराचा विदर्भात असलेला लौकीक कायम ठेवावा असे याप्रसंगी माजी आमदार देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी उपसभापती संजय कामनापुरे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विनोद घीया व माणकचंद सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृऊबाचे सभापती मनोहर खडसे यांनी केले. कार्र्यक्रमाचे संचालन श्रीधर लाभे यांनी केले तर आभार प्रवीण ढांगे यांनी मानले.सदर कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक सैय्यद अयुब अली, अमोल कसनारे, विजयशंकर बीरे, राजाभाऊ खेडकर, संजय लांबट, प्रमोद वंजारी, देवानंद भगत, प्रदीप लुटे, मंगेश वानखेडे, सुशील तिवारी, नटवरलाल मोकाती, अशोक पराळे, इंदू ठाकरे, शुभांगी ढुमणे, मोहन हावरे, मोहन शिदोडकर, मोरेश्वर खोडके, सुनील बासू, पवन महाजन, रमेश सावरकर, अ. जब्बार तंवर, सुरेश वैद्य, शैलेश पाळेकर, संजय भोंगे, हनुवंत नाखले, अशोक इंगळे, गुलाब डफरे, अजय देशमुख, दिलीप तायवाडे यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ranjit Kambaleरणजित कांबळेMarket Yardमार्केट यार्ड