प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतमजूर दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:23 PM2019-04-22T21:23:08+5:302019-04-22T21:23:27+5:30

नजीकच्या मोई येथे शेतात लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करण्यात आली होती. याच तारेचा स्पर्श झाल्याने शेतमजूर चंदू रामदास उईके (३२) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.

Due to the flow of a flowing electric star, the laborers are fed | प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतमजूर दगावला

प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतमजूर दगावला

Next
ठळक मुद्देमोई येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : नजीकच्या मोई येथे शेतात लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करण्यात आली होती. याच तारेचा स्पर्श झाल्याने शेतमजूर चंदू रामदास उईके (३२) याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.
मोई हा परिसर जंगलव्याप्त असून या भागात वन्य प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडून उभ्या शेतपिकांची नासाडी केली जात असल्याने काही शेतकरी तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करतात. असाच काहीसा प्रकार शेतकरी जाधव यांच्या शेतात भुईमुंग पिकाच्या संरक्षणासाठी करण्यात आला होता. येथे बॅटरीद्वारे कुंपनतारेत कमी दाबाची विद्युत प्रवाहित करण्यात आली होती. परंतु, ती अनावधानाने थेट करण्यात आल्याने व त्याच प्रवाहित विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने चंदू उईके याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सदर प्रकार राजू मोहर्ले यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. दरम्यान माहिती मिळताच सेलू पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. चंदू उईके याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Due to the flow of a flowing electric star, the laborers are fed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.