हिंगणघाट : सेवा निवृत्तीवेतन, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी १५ जुलैपासून सुरू झालेला ऩप़ कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप सुरूच आहे़ शासनाने अद्याप तोडगा न काढल्याने संप उग्ररूप धारण करीत आहे़ मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने पाणी पुरवठा व अग्निशमन विभागातील कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत़ यामुळे अत्यावश्यक सेवाही बंद झाल्या आहेत़ऩप़ कर्मचारी संघटनेने वरिष्ठांना कळवूनही शासनाने मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही़ यामुळे नगर परिषदेंतर्गत अत्यावश्यक सेवा बंद झाल्या आहेत़ कर्मचाऱ्यांच्या सर्वच मागण्या रास्त असताना निर्णय घेण्यासाठी शासन विलंबाचे धोरण अवलंबित आहे़ शासन कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याने कर्मचारी संघटनेने निषेध नोंदविला आहे़ संपाला उग्ररूप देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या अत्यावश्यक सेवा संपात सहभागी करून घेण्याबाबत कर्मचारी संघटनेची वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली़ यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पाणी पुरवठा व अग्निशमन यंत्रणा अनिश्चित बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे़ निर्माण होणाऱ्या गंभीर स्थितीला शासन जबाबदार राहील, असे निवेदनही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले़ शहरातील नागरिकांना संप काळात होणाऱ्या त्रासाबद्दल कर्मचारी संघटनेने दिलगीरीही व्यक्त केली आहे़ नाईलाजाने शासनस्तरावर मागण्यांबाबत निर्णय होईस्तोवर संप सुरूच राहील, असा इशाराही कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय खुपसरे, सुरेश आडेपवार, संजय मानकर, विश्वनाथ गाळवे, प्रभाकर कन्नाके, विजय खोब्रागडे, दिलीप झोरे, विजय वैद्य, दीपक ठाकरे, अनिल झाडे, अरविंद भोयर, दामू चाफले, शशिकांत बोकडे, गिरडकर, माटूळकर आदी उपस्थित होते़ संपाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पालिकेच्या अत्यावश्यक सेवा बंद
By admin | Updated: July 22, 2014 00:00 IST