शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या जिल्ह्यात ९५५ जणांना मद्य परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:01 IST

दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यात मद्य बाळगण्याकरिता मागील सहा महिन्यांत तब्बल ९५५ जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माजी सैनिकांसह, सर्वसामान्य व्यक्तींनी मद्यपरवाने मिळविले. जिल्ह्यात १९७५ ला शासनाने दारूबंदी केली.

ठळक मुद्देसहा महिन्यांतील स्थिती । राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यात मद्य बाळगण्याकरिता मागील सहा महिन्यांत तब्बल ९५५ जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माजी सैनिकांसह, सर्वसामान्य व्यक्तींनी मद्यपरवाने मिळविले.जिल्ह्यात १९७५ ला शासनाने दारूबंदी केली. जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असली तरी येथे बारमाही दारूचे पाट वाहतात. येथे दारूची राजरोस विक्री आणि रिचविलीही जाते. या अवैध व्यवसायात हजारावर हात गुंतले आहेत. अनेकांनी बेरोजगारीच्या कारणावरून या अवैध व्यवसायात शिरकाव केला आहे. बंदी असल्यामुळे जिल्ह्यात कायद्याने दारू बाळगणे गुन्हा आहे. असे असताना पोलिसांचे दररोज कुठे ना कुठे दारूविक्रेत्यांवर छापे घातले जातात. दारूसाठा जप्त करीत त्याची विल्हेवाट लावली जाते.माजी सैनिकांना मद्य बाळगण्याची इतर ठिकाणी मुभा आहे. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने त्यांच्यासह सर्वसामान्यांना मद्य बाळगायचे असल्यास मद्यपरवाना गरजेचा आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ९५५ जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक कार्यालयातून रीतसर मद्यपरवाने प्राप्त केले. जानेवारीमध्ये २२५ जणांनी मद्यपरवाने मिळविले. फेब्रुवारी १५५, मार्च १५९, एप्रिल १५०, मे १३७ तर जून महिन्यात १२८ जणांनी उत्पादन शुल्क कार्यालयाकडून रीतसर मद्यपरवाने मिळविले.असा मिळतो परवानापरवाना काढण्याकरिता उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अर्जाचा नमुना मिळतो. यातच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीचाही कॉलम आहे. अर्जदाराला या अर्जावर कोर्ट फी स्टॅम्प आणि दोन छायाचित्रे सोबतच आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे. हा अर्ज विभागाकडे स्वसाक्षांकित करून सादर करावा लागतो. केवळ १०० रुपयांत हा परवाना उपलब्ध होतो. दारूबंदीचा जिल्हा असल्याने येथे परवान्याकरिता वयोमर्यादेची अट ३० वर्षे आहे.परवान्याचा गैरवापर?मद्य परवाना असल्यानंतर कारवाईचा धाक राहात नसल्याने संबंधित व्यक्तीकडून इतर जिल्ह्यातून अनेकवार दारूसाठा विक्रीकरिता आणला जातो. एक प्रकारे परवान्याचा गैरवापरच अनेकांकडून केला जातो. ही वास्तविक स्थिती दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी