शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दुबार पेरणीचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:34 PM

पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या आटोपल्या असून उगविलेले अंकूर तापत असलेल्या उन्हामुळे करपणे ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ६० टक्के पेरण्या आटोपल्या : दुबार पेरणीकरिता मोफत बी-बियाण्यांची मागणी

पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या आटोपल्या असून उगविलेले अंकूर तापत असलेल्या उन्हामुळे करपणे सुरू झाले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलनच्या सहायाने उगविलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पीक वाचणे शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाशिवाय पर्याय नाही. यात आता दोन दिवसात पाऊस आला नाही तर पेरणीची मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. गत हंगामात आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यातच आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याचे चित्र निर्माण आहे. आलेले संकट कसे पेलावे या आशेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी दिसत आहे. यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून बियाणे आणि खते पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : मान्सून वेळेवर आणि भरपूर प्रमाणात येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी बीयांची लागवण केली. तीन दिवसानंतर हवामान खात्याला उपरती झाली हा मान्सूनपूर्व पाऊस असून मान्सूनचा पाऊस यायला अडचणी निर्माण झाल्याने तो नंतर येणार असल्याचे सांगितले. पावसाळ्याच्या नक्षत्रात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पावसाच्या दडीने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आल्याचे दिसत आहे.कृषी विभागाच्या सूचनेनुसार ६५ मि.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, आता हा ६५ मि.मी पाऊस एका दिवसात पडणारा की एकूण पडलेला पाऊस हे समजायला मार्ग नाही. जर एका दिवसात ६५ मि.मी. पाऊस झाला तर ती अतिवृष्टी समजली जाते. बोंडअळीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी यंदा मान्सूनपूर्व लागवड केली नाही. डिसेंबरनंतर फरदड घेवू नये, अशा सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहे. जर जुलैमध्ये दुबार पेरणी करावी लागली तर त्या कपाशीला कधी बोंड येईल व कापूस कधी वेचला जाईल त्यामुळे डिसेंबरचे वेळापत्रक पाळणे अवघडच आहे. डिसेंबर नंतर बोंडअळी आली तर कृषी विभाग पर्यायाने शासन हातवर करणार, हे आताच दिसून येत आहे.पवनार परिसरात जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. त्यापैकी ६० टक्के शेतकरी हा कोरडवाहू आहे. जर दोन दिवसात पाऊस नाही आला तर त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट गडद झाल्याचे दिसत आहे. ओलीत करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केल्यास भारनियमनामुळे तेही शक्य होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांवरचे संकट प्रत्येक वर्षी नवनव्या वेषात येत असल्याचे बोलले जात आहे.बोंडअळीचे अनुदानबोेंडअळीचे अनुदान बुधवारी जमा होईल हे नायब तहसीलदार दीपक राऊत यांनी ठासून सांगितल्यानंतरही ते शुक्रवार पर्यंत जमा झालेले नाही. शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेवून सांगतो असे मोघम उत्तर दिले, व नंतर मात्र त्यानी चुप्पीच साधल्याचे दिसले.

टॅग्स :agricultureशेती