लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : येथील नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात दोन कंटेनरची समारोसमोर धडक झाली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. संतोषकुमार पलटु मिसाद (२३) रा. मदनपूर उत्तरप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. नागपूर येथून पॉलिस्टर घेऊन एम.एच. ०४ जे. के. ८०६९ क्रमांकाचा कंटेनर मुंबईकडे जात होता. भरधाव कंटेनर सत्याग्रही घाटातील वळण रस्त्यावर आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्तादुभाजकावर चढले. अशातच केमिकल्स घेऊन जाणाऱ्या एम.एच. ४३ वाय. ८३९० क्रमांकाच्या कंटेनरला जबर धडक बसली. शिवाय वाहन उलटले. यात संतोषकुमार मिसाद याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर रामप्रसाद मिसाद हा किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या कंटेनरचा चालक नागेश चंदू कोकरे थोडक्यात बचावला. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
कंटेनरच्या धडकेत चालक ठार, क्लिनर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST