१५० व्या गांधीजयंतीनिमित्त राज्यभर राबविणार ‘दान उत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:27 PM2019-09-30T12:27:11+5:302019-09-30T12:27:38+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) च्यावतीने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये दान उत्सव (फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग) राबविला जाणार आहे.

'Donation Festival' to be organized across the state on the occasion of 9th Gandhi Jayanti | १५० व्या गांधीजयंतीनिमित्त राज्यभर राबविणार ‘दान उत्सव’

१५० व्या गांधीजयंतीनिमित्त राज्यभर राबविणार ‘दान उत्सव’

Next
ठळक मुद्दे लोकसहभाग मिळविण्याकरिता परिवर्तनसाथी आठवडाभर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) च्यावतीने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये दान उत्सव (फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग) राबविला जाणार आहे. गांधी जयंतीपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून ८ ऑक्टोंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाकरिता लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी स्वयंसेवकांची मोहीम ‘परिवर्तनसाथी’ प्रयत्नरत आहेत.
महाराष्ट्रातील १ हजार गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे मिशन व्हीएसटीएफ महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांमध्ये दान उत्सव साजरा करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८७ हून अधिक तालुके व ३२३ ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. या मोहिमेमध्ये स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शासन अशा विविध कृतींचा समावेश असणार आहे. यापूर्वी यापैकी अनेक कृती शहरांमध्ये राबविण्यात आल्या आहेत. पण, यंदा एमव्हीएसटीएफसह लोकांना मोठ्या संख्येने घेऊन या थोर कार्यासाठी गावकऱ्यांसह खांंद्याला खांदा लावून काम करण्याची अनोखी संधी आहे. तसेच स्वयंसेवक उपक्रमाच्या सादरीकरणाची घोषणा करीत एमव्हीएसटीएफने शहरी व ग्रामीण भागांमधील संस्था व लोकांना परिवर्तनसाथी बनण्याचे आणि गावाच्या सामाजिक विकासासाठी गावकऱ्यांसोबत सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. परिवर्तनसाथी बनण्यासाठी संकेतस्थळावर स्वयंसेवक म्हणून नाव, संपर्क क्रमांक आणि जिल्हा व पसंतीचे गाव अशी माहिती मेल करावी. नोंदणीकरिता अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०१९ मध्यरात्रीपर्यंत आहे. संस्था व स्वयंसेवकांनी अगोदरच पुढाकार घेतला असून ते जिल्हा परिषद शाळांचे सुशोभिकरण, शिक्षण प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन कार्यशाळांचे आयोजन, ग्रामीण भागांच्या आर्थिक साक्षरतेसंदर्भात काम, गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवित आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेचे नेतृत्व संबंधित गावांमधील मुख्यमंत्री ग्रामीण विकास सहकारी (सीएमआरडीएफ) करणार आहेत. सीएमआरडीएफ, गावकरी, गावातील अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या सहभागाची खात्री घेतील. ‘फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग’ आठवडा विविध सामाजिक विकास थिम्स राबविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

दानउत्सवाबाबत...
दानउत्सव (पूर्वीचा जॉय ऑफ गिव्हिंग विक) हा भारताचा ‘फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग’आहे. २००९ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फेस्टिव्हल दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जातो. जगभरातील विविध लोक एकत्र येत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. दानउत्सवासाठी कोणा एकालाच श्रेय देणे अशक्य आहे. नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान विविध व्यक्ती आणि एनजीओ लिडर्सनी पुढाकार घेऊन ‘इंडिया गिव्हिंग विक’ सुरू करण्याचे ठरविले आहे.

सहा दशलक्षाहून अधिक लोक देणार दान
विविध कार्यक्षेत्रांमधील कॉर्पोरेट्स कंपन्या, परोपकारी संस्था, व्यावसायिक लिडर्स, स्थानिक अधिकारी व संस्था अशा विविध भागधारकांचा सहभाग व सहयोग वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स ते मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी ते सेलिब्रिटी असे ६ दशलक्षांहून अधिक लोक महात्मा गांधीजी यांना मानवंदना म्हणून दान उत्सवाच्या आठवड्यादरम्यान समाजाचे ऋण म्हणून त्यांचा वेळ, पैसा, संसाधने किंवा कौशल्ये दान स्वरूपात देणार आहेत.

Web Title: 'Donation Festival' to be organized across the state on the occasion of 9th Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.