बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:51 PM2019-08-31T23:51:29+5:302019-08-31T23:51:50+5:30

श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.

Dogs held Vardhekar | बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

Next
ठळक मुद्देभीतीयुक्त वातावरण । नगरपालिका, ग्रामपंचायतींचे बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. श्वानाने चावा घेतल्याने एका वृद्धाला जीव नुकताच गमवावा लागला. मात्र, या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे पालिका, संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.
नगरपालिकेच्या हद्दीतील महादेवपुरा, हवालदारपुरा, गोंडप्लॉट, सुदामपुरी, मालगुजारीपुरा, इतवारा बाजार तर शहरालगतच्या नालवाडी, साटोडा, आलोडी , पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोकाट, बेवारस श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. पिसाळलेले, आजारग्रस्त श्वानांची संख्यादेखील मोठी आहे. यामुळे आजार बळावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बंदोबस्त करण्याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक भीतीयुक्त वातावरणात वास्तव्य करीत आहेत. पालिका, ग्रामपंचायतीने या समस्येची दखल न घेतल्यास बेवारस श्वानांमुळे अनेक बळी जाण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

शिकवणीला जाणारे विद्यार्थी दहशतीत
नालवाडी व साटोडा, पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलोडीसह अनेक वॉर्डांत बेवारस श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून पहाटे शाळा आणि शिकवणीवर्गाला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

पुलफैलात ज्येष्ठाला गमवावा लागला जीव
शहरातील विविध बेवारस श्वानांनी मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांनी प्रचंड चैदोस घातला आहे. अशाच एका बेवारस श्वानाने पुलफैलातील देविदास मोतीराम गजभिये या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला. यात त्यांना रेबीजची बाधा झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांनी श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधित नगरसेवक, पालिकेकडे मागणी केली होती. मात्र, कायम दुर्लक्ष करण्यात आले. यातच या ज्येष्ठाला जीव गमवावा लागला.

Web Title: Dogs held Vardhekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा