शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

डॉक्टरांची एन्ट्री तब्बल सव्वा तासांनी

By admin | Updated: June 26, 2014 23:26 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने

सरकारी रुग्णालयांचे विदारक वास्तव : रुग्णालयांचा परिसर घाण व दुर्गंधीयुक्तवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले. हे रुग्णालये जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी की वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी, असा सहज प्रश्न जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थितीवरुन निर्माण झाला. सकाळी ८.३० वाजतापासून सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्णांची गर्दी सुरू झालेली होती. रुग्ण आपली प्रकृती दाखविण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षापुढे ताटकळत होते. नऊलाही डॉक्टर आले नाही. काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टरची एन्ट्री साडे नऊ वाजतानंतर सुरू झाली. वास्तविक, बाह्य रुग्णांना तपासणीची वेळ ही सकाळी ८.३० ते १२.३० वा १ वाजतापर्यंतची आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी कधीही ही वेळ पाळत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे काही रुग्णांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर होते. ते औरंगाबादला बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मागील काही दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे आहे त्यासुद्धा वेळेत उपस्थित झालेल्या नव्हत्या. त्यांच्या कक्षासमोर विचारले असता मॅडम आता येईल, असे सांगण्यात आले. त्यांची काहीवेळ वाट बघितली असता त्या यायच्याच होत्या. वरिष्ठ अधिकारीच वेळेच्या बाबत उदासीन असल्यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी वेळ पाळत नसल्याचेही चित्र या ठिकाणी बघायला मिळाले. रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता रुग्णालय की कचरा डेपो हे कळायला मार्ग नव्हता. रुग्णालयाच्या इमारत क्र. १ मध्ये प्रसुती वॉर्ड आहे. त्याच्यापुढे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना भरती ठेवण्यात येते. या दोन्ही इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली होती. या परिसरातून नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाता येत नव्हते. या घाणीचा आणि दुर्गंधीच्या नवजात शिशूसह त्याच्या मातेला सामना करावा लागत होता. इमारतीच्या खिडक्याही घाणीने माखलेल्या अवस्थेत दिसून आल्या. काही रुग्णांशी संवाद साधला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी नियमित होत नाही. त्यामुळे त्याविभागात कार्यरत परिचारिकाच सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्यावरही कुणाचा वचक नसल्यामुळे त्यांचा रुग्णांशी व्यवहार जेमतेमच असतो. त्यामुळे आपल्या व्यथा कुणाला सांगाव्यात हे कळत नसल्याचे काही रुग्णांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सांगितले.औषधांची खरेदी आता केंद्रीय पद्धतीने होत असल्यामुळे सप्टेंबर ते आॅगस्ट अशी मागणी करण्यात येते. त्यानुसार औषधांना पुरवठा केला जातो, असे सांगण्यात आले. तुटवडा भासल्यास नऊ लाख रुपयांची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे औषधांचा तुटवडा भासत नसल्याचे दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)