शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तुम्ही करता, की आम्ही करू? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:15 IST

Wardha news farmer शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे.

ठळक मुद्देवनविभागांचे दुर्लक्ष, पिकांची होतेय नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गकोपात शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले. उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांनी थेट चिकणी,जामणी, पढेगाव, सोनेगाव, निमगाव, केळापूर, दहेगावकडे मोर्चा वळविला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करीत आहेत.वन्यप्राण्यांमध्ये रानडुक्कर व रोही यांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते . एवढेच नव्हे, तर रानडुक्कर संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेक शेतकरी व शेतमजूर जखमी झाले. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागली बंद झाली. मजूर शेतात कामावर येताना वन्यप्राण्यांची भीती व्यक्त करतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही, जनावरांबरोबर माणसांवरील हल्लेही वाढले आहेत.शासनाने शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळेल अशी व्यवस्था करावी, म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलित करण्याची वेळ येणार नाही.शेती करण्यासाठी संपूर्ण संरक्षण द्यावे; अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करेल, त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.शेतीचे नवे संकटनिसर्गाचा लहरीपणा आणि शेतकरी विरोधीधोरणात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यांमुळे नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे . यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

रानडुक्कर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचे कळप उभे पीक फस्त करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात शिथिलता आणून शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची गरज आहे.- सतीश दाणी, शेतकरी सोनेगाव (आबाजी).

टॅग्स :Farmerशेतकरी