शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहेब कार्यालयात वेळेवर येतात का? जिल्हा परिषदेकडे १० वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:07 IST

वर्षभरात १५ लाखांचा होतोय खर्च : योजनांच्या अंमलबजावणीसाठी करतात दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्यासाठी विभागप्रमुखांना दौरे करावे लागतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दहा शासकीय वाहने कार्यरत आहेत. या वाहनांच्या माध्यमातून योजनांच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्याचे काम अधिकारी करीत असतात. 

जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने दिली जातात, वर्धा जिल्हा परिषदेत मोजक्याच अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहने असून, इतर विभाग हे खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेत असतात. गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रशासक राज असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची वाहने आता अधिकारी किंवा विभागप्रमुखांना देण्यात आली आहे. 

एरवी पदाधिकारी असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींना शासकीय वाहन दिले जातात. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यासह महत्त्वाच्या विभागप्रमुखांनाही शासकीय वाहने दिली जातात. सध्या दहा वाहने उपलब्ध असून, दहाही वाहने अधिकाऱ्यांच्या सेवेत उपलब्ध आहेत. 

वर्षभरात १५ लाखांचा वाहन खर्चजिल्हा परिषदेत दहा शासकीय वाहने असून, त्याकरिता किलोमीटरप्रमाणे वर्षाकाठी इंधन व देखभाल दुरुस्तीकरिता दीड लाखांच्या खर्चाची तरतूद केली जाते. प्रतिवाहन दीड लाखांची तरतूद असल्याने दहा वाहनांवर साधारणतः वर्षाला १५ लाखांचा खर्च होतो. सध्या पदाधिकारी नसल्याने त्यांची वाहने अधिकारी वापरत आहेत. परिणामी, वाहनावरील खर्च या काळात कमी झाला नसून तो कायम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वगळता बांधकाम विभाग, सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांकरिता खासगी वाहने भाडेत त्त्वावर घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनावर लाखो रुपयांचा खर्च होत असून, काही अधिकाऱ्यांच्या दिमतीला दोन वाहने असल्याचेही चित्र आहे. काही अधिकारी दौऱ्याच्या नावावर वैयक्तिक सैर करण्यातही धन्यता मानत असल्याचे ओरड होत असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

सर्वाधिक वाहने भाडेतत्त्वावर जिल्हा परिषदेचा डोलारा मोठा असल्याने प्रत्येक विभागप्रमुखाला शासकीय वाहन देणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन दिली जाते. जिल्हा परिषदेत सध्या भाडेत त्त्वावरील वाहने भरमसाठ असून, त्यांच्याकडून नियमाला बगल दिली जात असल्याचे चित्र आहे. या वाहनचालकांनी आपल्या खासगी वाहनावर चक्क 'महाराष्ट्र शासन' असे लिहिले असून, हे नियमबाह्य आहे.

"जिल्हा परिषदेत १० शासकीय वाहने आहेत. यातील काही पदाधिकारी व काही अधिकाऱ्यांसाठी आहे. सध्या पदाधिकारी नसल्याने ती वाहने अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एका वाहनाकरिता वर्षाकाठी दीड लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये इंधन व देखभाल खर्चाचा समावेश आहे. इतर विभागात खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेतली जातात."-अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि. प. वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा