जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:38 AM2017-08-19T01:38:16+5:302017-08-19T01:40:26+5:30

आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते.

Do the work of Adarsh ​​village on the basis of water tank | जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम करा

जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम करा

Next
ठळक मुद्देराम शिंदे : आदर्श गाव विदर्भ विभागीय कार्यशाळा व आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते. याच धर्तीवर आदर्शगावाची कामे गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा आदर्शगाव राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी दिल्यात.
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेची विदर्भस्तरीय विभागीय कार्यशाळा व आढावा बैठक आज सेवाग्राम येथे यात्री निवासमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक कैलास मोते, अमरावतीचे सहसंचालक गवसाने, सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव, माधव कोटस्थाने सेवाग्रामच्या सरपंच रेश्मा जामलेकर उपस्थित होत्या.
गाव आदर्श करण्यासाठी येणाºया अडचणींचा आढावा घेऊन अडचणी सोडविण्यासाठी संबंधीत अधिकाºयांना सूचना दिल्या जातील. अडथळा निर्माण करणाºया अधिकाºयांवर कारवाईचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. आदर्शगावासाठी आलेला निधी त्याचवर्षी खर्च करावा. निधी अखर्चित राहणे गावाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. निधी एक वर्षात खर्च केल्यास निधी वाढवून देण्याची हमी सुद्धा त्यांनी दिली.
यावेळी एकनाथ डवले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून राज्यातून पहिल्या आलेल्या काकडदरा या गावाचा मंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार योजनेवर आधारीत सिडीचे प्रकाशन, आदर्शगाव मासिकाचे प्रकाशन व पूजा उमरेडकर व कराटेपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कैलास मोते यांनी तर संचालन उपसंचालक कापसे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर भारती यांनी व्यक्त केले. यावेळी ३१ गावांतील सरपंच, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था आणि अधिकारी उपस्थित होते.
२५ वर्षांत २५ गावे आर्दश करू - पोपटराव पवार
आदर्श गाव योजनेला १९९२ मध्ये सुरुवात झाली. त्याला २५ वर्ष पूर्ण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाच्या कामावर भर देऊन गावे दुष्काळमुक्त करण्यासोबतच उपजिवीकेसाठी गावांचे स्थलांतर होणार नाही यावर काम व्हावे. २५ वर्षात २५ आदर्श गावे शासनाला दाखवून द्यायची आहेत.
पहिल्या दहा गावांमध्ये ५ गावे विदर्भातील आहेत. विदर्भासमोर विदर्भातीलच गावांचे उदाहरण समोर ठेवले तर इतर गावांनाही त्यांची प्रेरणा मिळेल. पाणी जिरवणे, पाणी साठवणे, आणि साठलेल्या पाण्याचा विवेकाने व सामाजिक भान ठेवून उपयोग करणे महत्त्वाचे आहे. या योजनेत वर्धेतील १० गावांची निवड व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Do the work of Adarsh ​​village on the basis of water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.