शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संसारोपयोगी साहित्य आणत नाही म्हणून झाले कडाक्याचे भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:42 IST

नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे.

ठळक मुद्देकल्पना खोंड खूनप्रकरण : मोबाईल लोकेशनवरून आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे. कैलास हा घरात संसारउपयोगी साहित्य आणत नसल्याने मृतक व आरोपी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याचवेळी कैलास याने कल्पनाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.कल्पना व कैलास यांच्यात त्यांच्या राहत्या घरी भांडण झाले. हा त्यांचा घरगुती वाद असल्याने ग्रामस्थांनीही सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान आरोपीने कल्पनाचा गळा आवळून तिची हत्या करीत घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. गावात खून झाल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय खात्रिदायक माहितीच्या आधारे कैलासवर आरोपी असल्याचा ठपका ठेवून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणेदार प्रवीण डांगे यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविला. याच दरम्यान कैलासच्या मोबाईलचे लोकेशन संबंधित अधिकाऱ्यांकडून ट्रेस करीत त्यांनी संजय रिठे, बाळा तिवारी, महेंद्र गायकवाड, अभय खोब्रागडे यांना नाकाबंदी करण्यास सूचविण्यात आले. शिवाय हिंगणघाट आणि वडनेर पोलिसांनाही माहिती देण्याचे सांगण्यात आले. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती पोलिसांनी आरोपी कैलास खोंड याला वर्धा -हिंगणघाट मार्गावरील इंझाळा शिवारातून मध्यरात्री ३.१५ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार प्रवीण डांगे करीत असून आरोपीला जेरबंद करण्यासाठी संजय रिठे, बाळा तिवारी, महेंद्र गायकवाड, आरीफ फारूकी, सतिश नैताम, प्रवीण भोयर, निलेश गायकवाड, अभय खोब्रागडे, पिंटू पिसे, महेंद्र गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून