शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकऱ्यांना भीक नको; घामाचे दाम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:02 IST

कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे सरकारने गरज नसतानाही सातवा वेतन आयोग लागू करून कर्मचाऱ्यांचे हित जोपासले. परंतु कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे भाव न देता विविध घोषणा करुन त्यांची फसवणूक करीत आहे.

ठळक मुद्देविजय जावंधिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त कृषी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे सरकारने गरज नसतानाही सातवा वेतन आयोग लागू करून कर्मचाऱ्यांचे हित जोपासले. परंतु कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे भाव न देता विविध घोषणा करुन त्यांची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना भीक नको;घामाचे दाम द्या, हीच मागणी आहे. ती शासनाने पुर्ण करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी केले.तळेगाव येथे शेतकरी- शेतमजूर समर्पित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव सप्ताहानिमित्त कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, आपुलकी संघटनेचे संस्थापक अभिजीत फाळके , डॉ. मुकेवार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना जावंधिया म्हणाले की, शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. सकरकारकडून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतन आयोगाने शेतकऱ्यास मागे टाकले आहेत. पैशाच्या लफंगेगीरीवर लफंग्याचे नियंत्रण आहे, म्हणून अशी स्थिती आहे. असेच चक्र सुरु राहिले तर मरत नाही म्हणून जगत आहे, अशी विदारक अवस्था शेतकऱ्यांची राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आता संघटीतपणे लढा उभारावा, असे आवाहनही जावंधिया यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.सोबतच गावांच्या दारिद्र्याचे कारण व स्वावलंबाचे महत्व सांगताना ते म्हणाले की, ‘कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने द्यावा, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवा तिही ते दासी, अशा प्रकारे ग्रामगीतेतील ओवींचा दाखला देत शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम केले. या मेळाव्याला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपुलकी संघटनेचे संस्थापक अभिजीत फाळके यांनी केले. प्रास्ताविकातून शेतकरी व शेती प्रश्नाबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्याला सेलू, सिंंदी (रेल्वे), देवळी, कारंजा, आर्वी, आष्टी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दूरवरुन येणाºया या सर्व शेतकरी बांधवांच्या भोजनाची व्यवस्थाही आयोजकांच्यावतीने करण्यात आली होती. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचे काम मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. त्यामुळे शेतकºयांनाही आपला कोणीतरी पाठीराखा आहे, अशी भावना निर्माण झाली. मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची मान्यवरांनी थेट उत्तरे देऊन त्यांच्या प्रश्नांची उकल केली.या मेळाव्यासाठी प्रा. अरुण फाळके, भारत घवघवे, जयंत रणनवरे, राजू कोहळे, जनार्दन ढोक, निलेश बंगाले यासह परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन रवींद्र कोहळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राहुल भारती यांनी मानले. शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता डॉ. नारायण खेरडे, रणजीत वसू, राजू भांडेकर, पंकज भगत, योगेश श्रीराव, संकेत जाचक, प्रल्हाद पाटील यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावातील नागरिकांनी सहकार्य केले.शेतकरी संघटना शक्तीहीन झाली आहेशेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची ताकद होती. परंतु ती चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे शेतकरी संघटना शक्तीहिन झाली आहे. शेतकरी संघटना उभी करणाऱ्या नेत्यांनाच स्वार्थी लोकांनी दूर केले. याचा नेमका फायदा सरकार घेत आहे.शेतकरी संबंधाने नवनवीन सरकारच्या घोषणा फसव्या आहेत. सरकार स्वामिनाथन आयोग लागू का करीत नाही. परदेशात साखर २४ रुपये किलो आहे. आपल्या येथे ३८ रुपये किलो आहे. रुपयाचे अवमुल्यन झाल्यामुळे हा फरक आहे. शेतकऱ्यांचा सुशिक्षित बेरोजगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. आता अन्यायाविरूद्ध युवकांनी पुढे आले पाहिजे.देशाचा पोशिंदा शेतकरी असून सरकारकडून त्या पोशिंद्यालाच दुर्लक्षीत केले आहे. सातवा वेतन लागू करुन कर्मचाऱ्यांना मोठे केले पण, शेतकरी व शेतमजूर हा कंगाल झाला आहे. आर्थिक विवंचनेत मृत्यूला कवटाळत असतानाही सरकारला त्याचे सोयरेसुतक नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी