शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

समाजभान जपत पत्रकारिता करा

By admin | Updated: January 7, 2016 02:48 IST

लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभातून जनजीवनातील प्रत्येक बाबींची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते.

रामदास तडस : श्रीकांत बारहाते व हरीश इथापे यांना चौथा स्तंभ पुरस्कारवर्धा : लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभातून जनजीवनातील प्रत्येक बाबींची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ती केवळ संवेदनशील पत्रकारांमुळे. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करावी. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.दादाजी धुनिवाले मठ येथील सभागृहात श्रमिक पत्रकार संघाचा मराठी पत्रकार दिन व चौथा स्तंभ पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. अतिथी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू विनय देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, प्रा. राजेंद्र मुंढे आदी उपस्थित होते.आ.डॉ. भोयर यांनी वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. हा ठप्पा पुसून काढण्यासाठी पत्रकारांसह सर्वांनी समोर येणे गरजेचे असल्याचे सांगितले. सेवाग्राम विकास आराखडा ही संकल्पना मांडणाऱ्या श्रीकांत बारहाते यांनी या आराखड्याला पूर्णत्वास नेण्यासाठी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.गडेकर यांनी युवकांनी पत्रकारिता क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व लोकप्रतिनिधींपर्यत तो पाठविला असून लवकरच तो अंतिम स्वरूपात येईल, असे सांगितले. डॉ. देशपांडे यांनी समाजकार्यकर्ते व पत्रकारांनी अविरतपणे संवेदनशील राहून सातत्याने कार्य करीत राहावे. त्यांच्या सारख्या संवेदनशीलतेमुळे जागृत समाज निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. देवस्थान ट्रस्टचे सुनील बुरांडे यांनीही मार्गदर्शन केले.शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख देऊन समाजकार्यकर्ते श्रीकांत बारहाते, नाट्य कलावंत व दिग्दर्शक हरिष इथापे यांना मान्यवरांच्या हस्ते चौथा स्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सक्तारमूर्तींनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी, लेखन केल्याबद्दल प्रशांत देशमुख व प्रवीण होनाडे यांचाही शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दीप प्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम सुरू झाला. प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी केले. संचालन करीत आभार आनंद इंगोले यांनी मानले. पठाणकोट येथील हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली वाहिली.हिंगणघाट येथे पत्रकार दिनहिंगणघाट : सध्याच्या काळात समाजाचा पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. याचे मुख्य कारण भांडवलदारशाहीचा विळखा वृत्तपत्रसृष्टीला बसू लागला असून मूळ पत्रकारिता हरपत आहे, असे देवेंद्र गावंडे यांनी सांगितले.हिंगणघाट-समुद्रपूर तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते तर अतिथी म्हणून माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे उपस्थित होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांनी लेखणीतून संयम ठेवून वृत्तलेखन केले पाहिजे, असे अ‍ॅड. कोठारी यांनी सांगितले. शिंदे यांनी पूर्वग्रह दूषित भावनेने लिखाण करू नये, असा सल्ला दिला तर तिमांडे यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय मोहोड यांनी केले. संचालन संजय माडे यांनी केले तर आभार प्रदीप डगवार यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल कडू, दशरथ ढोकपांडे, मंगेश वनीकर, अब्बास खान, जयचंद कोचर, नरेंद्र हाडके, पंकज साखरकर, धनंजय बकाणे, राजेंद्र राठी, मनोज लोखंडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.सेलू येथे पत्रकार दिनसेलू : पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा स्तंभ आहे. त्यामुळे लिखान करताना समाजाचे भले होईल, हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पत्रकारिता करावी, असे जयेश रननवरे यांनी सांगितले.सेलू प्रेस क्लबद्वारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन पत्रकारदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभय बेदमोहता तर अतिथी म्हणून प्रफूल्ल लुंगे, संजय धोंगडे उपस्थित होते. प्रास्ताविक राजू कोहळे यांनी केले. लुंगे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याबाबत माहिती दिली. धोंगडे यांनी पत्रकारितेच्या आचार संहितेबद्दल विचार व्यक्त केले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाला भारत घवघवे, विजय माहुरे, सतीश वांदिले, राजेश वरटकर, रामप्रसाद लिल्हारे, सचिन धानकुटे, सतीश गोमासे, रोशन शिंदे, लोकेश वरकडे, प्रवीण धर्मे, शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वरटकर यांनी केले तर आभार घवघवे यांनी मानले. यावेळी पत्रकार उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)