शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:15 IST

येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : कामकाज ठप्प, भिंतीही ओल्या झाल्याने कार्यालयात थांबण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो. त्यामुळे गुरूवारी कार्यरत कर्मचाऱ्यांनी सदर कार्यालयात काम करण्यास नकार देत याच इमारतीच्या खालील खोलीत दिवसभऱ्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छताच्या गळतीमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले होते.शाळकरी मुला-मुलींसह तरुण-तरुणींमध्ये मैदानी खेळ आणि खेळाडूवृत्ती रुजावी यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जाते. येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात एकूण ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या येथे सातच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही कार्यारत असलेल्या सात कर्मचाºयांपैकी दोघांची बदली झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच या कार्यालयाचा डोलारा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. येथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी मनमर्जीनेच काम करीत असल्याने त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. सुसज्य आणि अवघ्या काही वर्षांपूर्वी तयार केलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या इमारतीला गळती लागल्याने कुठल्या गुणवत्तेचे काम त्यावेळी करण्यात आले याचा दाखलाच सध्या या कार्यालयाचा फेरफटका मारल्यावर मिळतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.कागदपत्रांना ताडपत्रीचा आधारजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला चांगलीच गळती लागल्याने गुरूवारी या कार्यालयातील कामकाजावर याचा परिणाम झाला. इतकेच नव्हे तर सुसज्य इमारतीच्या छताला गळती लागल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांनी कार्यालयीन कागदपत्रे ओली होऊ नये म्हणून त्या एकाठिकाणी करून त्यावर ताडपत्री टाकल्याचे दिसून आले. असे असले तरी काही प्रमाणात कागदपत्रे ओली झाल्याचे सांगण्यात येते.भिंतीत विद्युत प्रवाहितछताला गळती लागल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जलमयच झाले. इतकेच नव्हे तर या कार्यालयातील प्रत्येक भिंत ओली झाली असून त्याला स्पर्श केल्यावर विद्युत प्रवाहाचा सौम्य झटका बसत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन गुरूवारी या कार्यालयातील कर्मचाºयांनी कार्यालयात न थांबता तळ मजल्यावरील एका खोलीत आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला.छताला गळती लागल्याने आणि भिंतीही ओल्या झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन कर्मचाºयांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. छताला गळती लागल्याने कार्यालयातील कामकाम प्रभावीत झाले आहे. दोन दिवसांपासून ही गळती सुरू आहे.- लतीका माने, जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Rainपाऊस