शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

शेतकरी संघटनेचा जिल्हाकचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,

ठळक मुद्देकर्जमाफी फसवीच, आरोप : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांनी कर्जमाफीच्या विरोधात नारेबाजी करीत वरिष्ठांपर्यंत मागण्या पोहोचविण्यांकरिता जिल्हाधिकाºयांना साकडे घातले.राज्य सरकारला आपल्या सकल राज्य उत्पन्नाच्या २४ टक्के कर्ज उभे करण्याची मुभा असते. महाराष्ट्र राज्यावरील कर्जाच्या बोज्याची मर्यादा सध्या १६.५ टक्केवर पोहोचलेली आहे. तेव्हा कर्जमुक्तीसाठी निधी उभा करण्यास राज्य सरकारला बºयापैकी वाव असल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करावा. कर्जबाजारीपणा व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतमालाला योग्य भाव दिल्या जात नाही. शेतकºयाच्या हितासाठी असलेला स्वामिनाथन आयोग लागू करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातून निघालेल्या मोर्चाने दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाधिकाºयांना निवदेन देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला.आंदोलनात गंगाधर मुटे, संध्या राऊत, सचिन डाफे, शैलजा देशपांडे, मधुसुदन हरणे, सतीश दाणी, गजानन निकम, पांडुरंग भालशंकर, निळकंठ घवघवे, सुभाष बोकडे, नंदु काळे, प्रभाकर झाडे, धोंडबा गावंडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अन्यथा उपोषणमोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना मंगळवारी सादर करण्यात आले. निवेदनात नमुद असलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने येत्या काही दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास ३ सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.शेतकरी विरोधी धोरणाचा निषेधहुतात्मा स्मारक परिसरात एकत्र झालेल्या शेतकरी व आंदोलनकर्त्यांना मोर्चा पूर्वी माजी आमदार सरोज काशीकर, गंगाधर मुटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर ताशेरे ओढले. तसेच कुठलीही अट न लावता राज्यातील सर्वच शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली.