शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक झालेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून द्यावे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

२०१४-१५ मध्ये टालाटुले बंधूंनी खरेदी केलेल्या २० हजार क्विंटल कापसाचा मोबदला मिळावा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्त्वात धडक दिली. कापसाचे पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, पण अद्यापही मोबदला मिळालेला नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६ मध्ये एक रिट पिटीशन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या पैशाची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार पेठ असलेल्या सेलू बाजारपेठेत सुनील टालाटुले आणि अतुल टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला, पण या शेतकऱ्यांना कापसाचे पैसे देण्यात आले नाहीत. या प्रकरणी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान फसगत झालेल्या शेतकऱ्यांची बाजू किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी मांडली. फसवणूक झालेल्या ४०० शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वत: पुढाकार घेऊन त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी केली.२०१४-१५ मध्ये टालाटुले बंधूंनी खरेदी केलेल्या २० हजार क्विंटल कापसाचा मोबदला मिळावा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्त्वात धडक दिली. कापसाचे पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, पण अद्यापही मोबदला मिळालेला नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६ मध्ये एक रिट पिटीशन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या पैशाची मागणी केली. तेव्हा जुलै २०१८ मध्ये २० ऑगस्ट २०१८ पर्यंत शेतकऱ्यांचे थकलेले कापूस चुकाऱ्याचे पैसे टालाटुले बंधूंनी द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. शिवाय दिलेल्या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास जिल्हाधिकारी यांनी महसुली वसुलीच्या नियमानुसार टालाटुले बंधूंच्या संपत्तीचा लिलाव करावा, असा आदेशही दिला. असे असले तरी २०१८ पासून अद्याप जिल्हा प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतली नाही.  त्यानंतर कोर्टाची अवमानना याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यामध्ये तहसीलदार सेलू व जिल्हाधिकारी वर्धा यांच्यावर  अवमानना याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २७ ऑक्टोबर २०२१ ला त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला. २७ ऑक्टोबर २०२१ ला टालाटुले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिलाव रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली. लिलाव रद्द करण्याबाबत केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे, तर आता २४ नोव्हेंबर २०२१ ला जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे त्यांनी ठरलेला लिलाव रद्द करण्याबाबत एक शपथपत्र सादर केले व त्याची सुनावणी मंगळवारी, ३० नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सुनावणीदरम्यान अविनाश काकडे, मोहन सोनूरकर, सुदाम पवार व शेतकऱ्यांची बाजू ॲड. रवी बोबडे यांनी मांडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्धा यांनी महाठगबाज टालाटुले बंधूंकडून शेतकऱ्यांचे हक्काचे कापसाचे पैसे मिळू द्यावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी फसवणूक झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी