शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी जिल्हा प्रशासनाच्या बैठका

By admin | Updated: May 4, 2015 02:00 IST

शासनाने जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेकरिता शासकीय स्तरावर बैठकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहे.

हरिदास ढोक  देवळी शासनाने जाहीर केलेल्या सावकारी कर्जमाफी योजनेकरिता शासकीय स्तरावर बैठकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहे. देवळी तालुक्यात दीड हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून आणखी अर्ज येणे सुरू आहे. शासकीय निकषानुसार १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्याच्या कालावधीतील सावकारी प्रकरणे पात्र ठरणार आहे. या कालावधी व्यतिरिक्त प्राप्त झालेले अर्ज नियमबाह्य ठरणार असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होणार आहे. प्राप्त अर्जाची छानणी तहसीलदार, तालुका उपनिबंधक व लेखा परीक्षक या तीन सदस्यीय समितीमार्फत होणार आहे. यासाठी उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील परवानाधारक सावकारांकडून गहाणपत्राची माहिती मागविली जात आहे.सावकाराच्या तावडीतून सुटण्यासाठी शासनाने विदर्भ मराठवाड्यातील कास्तकारांसाठी १७१ कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. यात सरसकट सावकारी कर्जाची माफी न देता आठ महिन्याच्या विशिष्ट कालावधीसाठीच ही योजना अंमलात असल्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. काहींनी मुलींच्या लग्नासाठी तर काहींनी शेतीकरिता सावकारी कर्ज घेतल्याच्या बोलक्या प्रतिक्रीया मन विषन्न करणाऱ्या ठरत आहे. सावकारांनी एक टक्का व्याजाऐवजी नियमबाह्य तीन टक्क्याची आकारणी केल्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या गहाण पत्राच्या सर्वच पावत्या कच्च्या कागदावर आहे. या सर्व पावत्या तालुका उपनिबंधकांकडे देण्यात आलेल्या अर्जासोबत जोडण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची असहायता प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे. सावकारी कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी लाभार्थी हा सातबाराधारक शेतकरी असावा तसेच तो पगारदार निवृत्तीधारक किंवा दुकानदार नसावा. तालुक्याच्या कार्यक्षेत्रात त्याची शेती असावी, कुटुंबातील सभासदाने सावकाराकडे सोने गहाण ठेवलेले असावे, अशा सर्व अटींची पूर्तता करण्यात आलेल्या अर्जाची छानणी तीन सदस्यीय समिती करणार आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार, सचिव तालुका उपनिबंधक व सदस्य म्हणून लेखापरीक्षक राहणार आहेत. या समितीने पारीत केलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले जाणार आहे. अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, सदस्य सचिव जिल्हा निबंधक तसेच लेखापरीक्षक वर्ग १ सदस्य असलेल्या समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर सावकाराच्या बँक खात्यात कर्जाचे पैसे वळते केले जाणार आहे.