लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे माहिती होताच शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक वस्तूंसाठी आजही पाहायला मिळते. तर शहरातील बँकांमध्येसुद्धा आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते. या गर्दीच्या अनुषंगाने बँकेकडून विशेष काळजीदेखील घेतली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र, शहरातील असलेल्या एटीएम मशीनचे निर्जंतुकीकरण करण्यात आले का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे. शहरात सुमारे २० ते ३० एटीएम मशीन आहेत. त्यापैकी बँक ऑफ इंडिया, एसबीआय, अॅक्सीस बँकेचे एटीएम बॅचलर रोडवर आहेत. या मशीनमधून अनेक नागरिक पैसे काढतात. त्याचबरोबर शहरातील इतरही एटीएमवरून जास्त प्रमाणात पैसे काढले जातात. त्यामुळे या एटीएम मशीनद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील एटीएम मशीन टचस्क्रीन असून स्वत:चा पासवर्ड टाकण्यासाठी एटीएम मशीनवर असणाऱ्या बटणाचा वापर केला जातो. त्यामुळे शहरात असणाऱ्या एटीएमचे निर्जंतुकीकरण करून कोरोनाची साखळी तोडण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
एटीएम मशीनचे निर्जंतुकीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST
शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक वस्तूंसाठी आजही पाहायला मिळते.
एटीएम मशीनचे निर्जंतुकीकरण करा
ठळक मुद्देमागणी : कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता