शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जखमींवरील उपचारात व आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत खोडा

By admin | Updated: July 6, 2016 02:25 IST

खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही.

पोलीस यंत्रणा हतबल : डॉक्टर अवैध रजेवरआकोली : खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही. यामुळे वैद्यकीय तपासणीत अडथळा निर्माण होतो. सदर आरोपींना सामान्य रुग्णालय वर्धा येथे नेल्यास डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून देण्यास नकार देतात. यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे.वर्धा-आर्वी व खरांगणा-कारंजा मार्गावर नेहमी अपघात होतात. अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित व वेळीच उपचार मिळणे अत्यावश्यक असते; पण खरांगणा येथे रात्रपाळीत कुणी राहत नाही. शिवाय दिवसाही मिटींग वा अन्य कारणाने डॉक्टर गैरहजर असतात. परिणामी, जखमींना आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते; पण तेथील दोन्ही डॉक्टर अवैध रजेवर आहेत. प्रभारीवर इतर ठिकाणचा भार असल्याने दवाखाना नेहमी डॉक्टरविना असतो. यात जखमींवर त्वरित उपचार होत नसल्याची ओरड जनता व पोलीस यंत्रणेकडे होत आहे. भांडणातील जखमी फिर्यादी व आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय पूढील कायदेशीर कार्यवाही करणे अडचणीचे असते. खरांगणा व आंजी (मोठी) येथील दवाखान्यात डॉक्टर गैरहजर राहत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी संबंधितांना सामान्य रुग्णालयात पोलीस घेऊन जातात; पण तेथील डॉक्टर ज्या हद्दीत घटना घडली, तेथेच वैद्यकीय तपासणी करा, आम्ही करून देणार नाही, अशी भूमिका घेतात. डॉक्टरांची नकारघंटा कायदेशीर योग्य असली तरी पोलिसांच्या कार्यवाहीत अडचणी निर्माण करणारी ठरते. पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेत त्रासाबद्दल माहिती दिली असता डॉक्टरांचा नकार योग्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविल्याचे पीएसआय विनोद राऊत यांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी जखमींना घेऊन कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(वार्ताहर)