शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाटकांच्या नवनिर्मितीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:37 IST

अध्ययन भारतीसोबत संलग्न अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी बोधी कला कार्यशाळा रोठा येथे घेण्यात आली.

ठळक मुद्दे३९ वी कार्यशाळा : अ‍ॅग्रो थिएटर व बोधी नाट्य परिषदेचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतवर्धा : अध्ययन भारतीसोबत संलग्न अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी बोधी कला कार्यशाळा रोठा येथे घेण्यात आली. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, यापलीकडे जाऊन ज्ञानासाठी कला या उद्देशाने प्रेरित या कार्यशाळेत नवीन विषयांवरील संहिता लेखन यावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली. तसेच नाटकात प्रयोगशील निर्मिती या अनुषंगाने सखोल मांडणी केली.या दोन दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नाट्य व सिनेदिग्दर्शक हरीश इथापे होते. तसेच प्रसिध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, नाट्य समीक्षक डॉ. सुरेश मेश्राम, नाट्य दिग्दर्शक अशोक हंडोरे (मुंबई), डॉ. शशिकांत बºहाणपुरकर (औरंगाबाद), भगवान हिरे (नाशिक), लेखक श्याम पेठकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत मधू जोशी, सलीम शेख, वैदेही चौरे, जीवने (नागपूर), अमोल अढाव (अमरावती), रूपराव कामडी, राजेश गजभिये (उमरेड), राजा भगत, मामा मरघडे (यवतमाळ), प्रा. शांतरक्षित गावंडे (नेर) यांच्यासह युवा रंगकर्मीही सहभागी झाले होते.नाट्यवाचन सत्रात नवनिर्मित नाट्यसंहितांचे वाचन व चर्चा झाली. किरवंत, घोटभर पाणी, तनमाजोरी, गांधी आणि आंबेडकर अशा वेगळे आत्मभान जोपासणाºया नाट्यकृतींचे लेखक प्रेमानंद गज्वी यांची ‘छावणी’ ही नवी संहिता, श्याम पेठकर यांची ‘पुरुष गाळणाºया बायकांचा गाव’ आणि ‘तेरव’, भगवान हिरे यांचे ‘अनफेयर डिल’, सलीम शेख यांचे ‘रक्षंत रक्षिती’ या नाटकांचे तसेच प्रा. इंगोले यांच्या ‘नरपशू’ एकांकिकांचे कार्यशाळेत वाचन केले. नवसंहितांवर विस्ताराने चर्चाही करण्यात आली. शेतशिवारात पार पडलेल्या या निवासी कार्यशाळेत नाट्यविष्कारावरील चर्चेसोबत ग्रामीण जीवनाचा आनंदही सहभागी लेखक व कलावंतांनी घेतला. अध्ययन भारतीच्या युवा पथकाने ‘आठवण सावित्रीची’ हे पथनाट्यही महाराष्टÑातील ज्येष्ठ रंगकर्मीसमोर सादर केले.