शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

वर्धा नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

By admin | Updated: October 20, 2016 17:25 IST

कामांत अनियमिततेचा ठपका ठेवत वर्धा पालिकेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्याविरूद्ध उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २० - कामांत अनियमिततेचा ठपका ठेवत वर्धा पालिकेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्याविरूद्ध उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर निर्णय झाला असून कुत्तरमारे यांना नगराध्यक्षपदाकरिता अपात्र ठरवित त्यांचे सदसस्यत्वही रद्द करण्याबाबतचा आदेश गुरुवारी पालिकेत धडकला. या आदेशात त्यांना येत्या सहा वर्षांत इतर दुसरी कुठलीही निवडणूक लढविता येणार नसल्याचे उल्लेखित असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.

राज्य शासनाचे ग्रामविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी राज्यपालाच्या परवानगिने हा आदेश चार दिवसांंपूर्वीच काढला. शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या या आदेशावर राज्य शासनाचे उपसचिव अ. परशुरामे यांची स्वाक्षरी आहे. हा आदेश चार दिवसांपूर्वीचा असला तरी तो गुरुवारी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. हा आदेश मिळताच दोन आठवड्यानंतर नगराध्यक्ष कुत्तरमारे यांना पदभार सोडून मुक्त व्हावे लागणार आहे. यामुळे पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कारभार उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांच्याकडे येणार अशी चर्चा पालिकेच्या अवारात आहे. शिवाय नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना उच्च न्यायालयातून या आदेशाविरोधात स्थगणादेश आणण्याचा मार्ग बंद व्हावा याकरिता त्यांनी आदेश येताच गुरुवारी उच्च न्यायालयात आदेशासंदर्भात कॅव्हेट दाखल केल्याची माहिती आहे.

येथील नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी वर्धा पालिकेत नियमानुसार नगरसेवकांच्या सभा घेतल्या नाही. तसेच त्यांच्या अधिकारात येत नसताना त्यांनी अमेरीकेच्या एका सेवाभावी संस्थेला वर्धेत काम करण्याकरिता सहकारी बनविले. शिवाय कुत्तरमारे यांच्या मुलाला पालिकेच्या कामात हस्तक्षेप करीत लाच स्वीकरल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. यासह आणखी दोन अशा एकूण पाच तक्रारी कुलधरीया यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर केल्या होत्या. यातील दोन तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये चौकशी करून तो अहवाल शासनाकडे पाठविला. या अहवालावरून राज्य शासनाने त्यांना पालिका अधिनियम १९६५ चे कलम ५५ (अ) (पदमुक्त करणे), ५५ (ब) (सदस्यता रद्द करणे) नुसार नोटीस बजावली होती. हा नोटीस मिळण्यापूर्वीच कुत्तरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

३० आॅगस्ट २०१६ रोजी कुत्तरमारे यांना सदर नोटीस प्राप्त झाली. याच वेळी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात त्यांची सुनावणी सुरू होती. याची माहिती मिळताच कुलधरीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात जात न्यायाधीश बी. आर. गवई व व्ही. एम. देशपांडे यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालानुसार या प्रकरणात शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा किमान दोन आठवडे नगराध्यक्षांवर कुठलाही प्रभाव होणार नसल्याचे सांगितले होते. शिवाय सदर प्रकरण नगर विकास विभागात सुरू असल्याने त्याचा निर्णय तेथेच लावावा अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत. त्यानुसार नगर विकास मंत्रालया दोन्ही पक्षांचे लेखी म्हणणे घैवून हा निर्णय दिल्याची माहिती आहे.

वर्धा पालिकेत आतापर्यंत सहा नगरसेवकांवर सदस्यत्त्व रद्दची कारवाई वर्धा पालिकेच्या नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई होण्याची हा दुसरी वेळ आहे. या पूर्वी १९८६-८७ मध्ये नगराध्यक्ष रमेश शेंडे असताना त्यांच्यावर अशीच कारवाई करण्यात आली होती. तर सदस्यत्त्व रद्द होण्याची सहावी वेळ आहे. विशेष म्हणजे या सर्वच प्रकरणात तक्रारकर्ता म्हणून कमल कुलधरीयाच आहे.

आचारसंहिता असताना शासनाने हा आदेश काढला आहे. यामुळे विकास कामांवर सत्ता जड असल्याचे दिसून आले. पादमुक्तीचा आदेश असला तरी दोेन आठड्याचे प्रोटेक्शन आहे. या दोन आठवड्यात आपण न्यायालयात धाव घेवून न्यायालयीन लढाई सुरू ठेवू. - त्रिवेणी कुत्तरमारे, नगराध्यक्ष वर्धा.

राज्य शासनाकडे केलेल्या पाच तक्रारींपैकी दोन तक्रारींवर चौकशी होवून हा आदेश काढण्यात आला आहे. यात नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे आदेश आहे. या आदेशाविरोधात त्यांना न्यायालयातून स्थगनादेश आणणे सहज सोपे होवू नये याकरिता आजच उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात येईल.- कमल कुलधरीया, उपाध्यक्ष, न.प. वर्धा.