लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मैत्री टिकवणे आणि लोकांना हसविणे हे कठीण कार्य आहे. मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध केवळ परस्पर विश्वासाने आणि स्नेहपूर्ण संबंधानेच वृद्धिंगत होतात, असे मत हास्य सिने अभिनेता एहसान कुरेशी यांनी व्यक्त केले.गायत्रीदेवी अग्रवाल सेवा संस्था देवळी आणि ओ.पी. नय्यर फॅन्स क्लबद्वारे आयोजित स्नेहबंधन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल होते.मुंबई येथील हास्य कलाकार रियाज इंडियन, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, नाना पहाडे, अॅड. विजयसिंह ठाकूर, इमरान राही, अनुप कपूर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी एहसान कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमरान राही तर संचालन महेश अग्रवाल यांनी केले.आभार नाना पहाडे यांनी मानले. यावेळी हरीश ओझा, श्रीकिसन भुतडा, प्रकाश कांकरिया, नरेश अग्रवाल, मोहन जोशी, गोल्डी बग्गा, दिनेश क्षीरसागर, किशोर कामडी, ममता दिदी, अनिल नायडू, किशोर मिटकरी, प्रकाश रायटर, दिनेश अग्रवाल, मनोहर पंचारिया, भक्तराज अलोणे, नंदू कुरेकर, सुरेश श्रीरंगवार आदी उपस्थित होते.
मैत्री टिकवणे आणि लोकांना हसविणे कठीण कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST
मुंबई येथील हास्य कलाकार रियाज इंडियन, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, नाना पहाडे, अॅड. विजयसिंह ठाकूर, इमरान राही, अनुप कपूर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी एहसान कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमरान राही तर संचालन महेश अग्रवाल यांनी केले.
मैत्री टिकवणे आणि लोकांना हसविणे कठीण कार्य
ठळक मुद्देएहसान कुरेशी : देवळी येथे स्नेहबंधन सोहळा