शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:09 IST

यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल........

ठळक मुद्दे‘मजिप्रा’ला डीपीआर तयार करण्याच्या सचिवांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या आहेत.धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा न.प. प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १६ हजार कुटुंबियांना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागातील सुमारे १७ हजार कुटुंबियांना पाणी पुरवठा करते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने त्याला कसा आळा घालता येईल हे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होते. मंगळवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी पार पडलेल्या विशेष बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदर सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी बनकर, जि.प. सिंचन विभागाचे गहलोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता वाघ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गवळी, वर्धा पाटबंधारे विभागाचे एस. बी. काळे तसेच सर्व न.प.चे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्र्यांनी १५ सरपंचांशी साधला संवादसदर बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील १५ सरपंचाशी थेट संवाद साधला. यावेळी सरपंचांनी मुख्यमंत्री दरबारी आपल्या विविध मागण्या रेटल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरपंचांच्या सदर मागण्या पूर्णत्त्वास जाण्यासाठी काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल संबंधित अधिकाºयांनी ४८ तासात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.गाळमुक्त धामविषयी चर्चाच नाहीभविष्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी धाम गाळमुक्त होणे गरजेचे आहे. परंतु, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महाकाळी येथील धाम प्रकल्प गाळमुक्त होण्यासाठी काय कार्यवाही केली जात आहे. तो किती दिवसांत गाळमुक्त होईल या विषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान धामच्या उंची वाढीचा विषयाची माहिती प्रधान सचिव चहल यांना देण्यात आली. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने काढलेल्या त्रुट्यांची पुर्तता सध्या केली जात असल्याचे यावेळी चहल यांना अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई