शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अवमूल्यन; सोयाबीन ३,३९९ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 23:49 IST

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरीच सोयाबीनची साठवणूक केल्याचे दिसून येते. असे असले तरी सोयाबीनच्या दरात पाहिजे तशी वाढ होण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांनी व्यक्त केले मत : दरात वाढ होण्याची चिन्हे नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरीच सोयाबीनची साठवणूक केल्याचे दिसून येते. असे असले तरी सोयाबीनच्या दरात पाहिजे तशी वाढ होण्याची शक्यता नाही. सध्या सोयाबीनला मिळत असलेला सुमारे ३,३९९ रुपये हा दर रुपयाचे अवमूल्यन झाल्याने मिळत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.प्राप्त माहितीनुसार, सन २०१३ मध्ये अमेरिकेत सोयाबीनला प्रती बुशेल १४ डॉलरचा दर मिळाला होता. त्यावेळी भारतातही सोयाबीनला ३,२०० ते ३,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. सध्यास्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला योग्य भाव मिळेल या प्रतीक्षेत घरात सोयाबीनची साठवणूक केली आहे. परंतु, भविष्यात सोयाबीनच्या भावात अतिशय जास्त वाढ होणार नसल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडे-थोडे सोयाबीन विक्री करण्यासाठी हाच कालावधी असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांना ३ हजार ६०० च्या घरात भाव मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतल्यास त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरणारे असल्याचे सांगण्यात येते.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ३,५०० पोते सोयाबीन तारणशेतमाल तारण योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमालाचा काटा होताच तात्काळ ७५ टक्के रक्कम दिली जाते.शेतमाल तारण योजना शेतकरी हितार्थ असल्याने वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये ती कार्यान्वीत करण्यात आली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या स्थितीत शेतमाल तारण योजनेंतर्गत सुमारे ३ हजार ५०० पोते सोयाबीन शेतकऱ्यांनी ठेवले असल्याचे सांगण्यात येते.निर्यातीची शक्यता धूसरचभाजप सरकारसह भाजपाच्या पदाधिकाºयांकडून सध्या यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन या शेतमालाची भारतातून निर्यात होईल, असे सांगितले जात आहे. परंतु, वास्तविक पाहता अमेरिकेत भाववाढीची शक्यता नाही. शिवाय, निर्यात संदर्भातील धोरण स्पष्ट नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.सोयाबीनला सध्या व्यापाऱ्यांकडून ३,२०० ते ३,२५० रुपये भाव दिला जात आहे. तर शासकीय खरेदी केंद्रावर ३ हजार ३९९ दर सोयाबीनला मिळत आहे. दोन्ही दरात जास्त तफावत नसली तरी भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. कापसाची आवक सुरू झाल्याने व त्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. सोयाबीनच्या भाववाढीची स्थिती सध्या नाही.- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.यावर्षी कमी पाऊस झाला. शिवाय सोयाबीन ऐन फुलावर आले तेव्हा परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे उत्पादनात घट आली. अशात सध्याचे दर न परवडणारेच आहेत. त्यामुळे थोडा भाव वाढला तर सोयाबीन विक्रीला काढण्याचा विचार आहे.- दिनकर काकडे, शेतकरी, आकोली.पावसाच्या लहरीपणाचा सोयाबीन पिकाला फटका बसला. शिवाय शेती जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. सोयाबीनला सध्या मिळत असलेले दर व पेरणी, खत, मजुरी असा उत्पादन खर्चचा हिशेब काढल्यावर ताळमेळच बसत नाही. अवघ्या ३ हजार २०० रुपयांमध्ये सोयाबीन विकण्यास न परवडणारेच आहे. सायाबीनचे दर किमान ३ हजार ६०० च्या घरात जाईल, अशी आशा आहे.- वसंत ठाकरे, शेतकरी, लादगड.उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे दुर्दैवच आहे. सोयाबीन पिकविण्यासाठी एकरी येणारा खर्च, पिकणारे सोयाबीन व बाजारात मिळणाऱ्या दराची सांगड घालून पहावी म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना कळतील. भाववाढीची प्रतीक्षा आहे.- नरेश तेलंग, शेतकरी, सहेली.सोयाबीनच्या भावात खूप वाढ होईल अशी शक्यता सध्या नाही. सध्या सोयाबीनला मिळत असलेला भाव मोदी सरकारने दिलेला भाव नाही. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने भारतात सध्या सोयाबीनला सुमारे ३,३९९ प्रती क्विंटल दर मिळत आहे. सन २०१३ मध्ये अमेरीकेत सोयाबीनला प्रती बुशेल १४ डॉलर भाव होता. त्यावेळी भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ३,२०० ते ३,३०० रुपये भाव मिळाला होता. सध्या अमेरिकेत सोयाबीनला प्रती बुशेल ९ डॉलर भाव आहे. तेथे भाव वाढीची शक्यता नाही आणि निर्यातीचे चित्र नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी थोडे-थोडे सोयाबीन विकल्यास हरकत नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड