शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पाण्याची टाकी बांधकामाच्या चौकशीची मागणी धूळ खात

By admin | Updated: November 13, 2015 02:10 IST

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी...

पुलगाव : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधकामास मंजुरी दिली. तत्कालिन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुमारे चार वर्षांपूर्वी २८ लाख ६० हजार ५०० रुपये खर्चून टाकीचे बांधकाम झाले; पण निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे टाकीतून पाणी गळते. यमुळे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी होत आहे. अद्याप चौकशी होत नसल्याने असंतोष पसरला आहे.२००१ च्या जणगणनेप्रमाणे कवठा (रे.) येथील लोकसंख्या २२८२ इतकी होती. २००९ मध्ये २३४० तर २०२४ मध्ये २४३५ होईल, असा अंदाज आहे. गावात सात विहिरी व सात हातपंप आहेत. यातील पाणी पातळी खालावत असल्याने ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांची गरज लक्षात घेत तेथे आठ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यास मंजुरी देत शासनाने निधी उपलब्ध करून दिला. वर्धेच्या कंत्राटदारांनी चार वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण केले; पण निकृष्ठ बांधकामामुळे टाकीत पाणी राहात नाही. पाणी गळते, टाकी कधीही कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यामुळे सध्या सदर टाकी शोभेची ठरत आहे. कवठा (झो.) येथील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सतत कंत्राटदारावर कारवाईची मागणी करीत आहेत. ग्रा.पं. च्या सर्वसाधारण सभा, ग्रामसभा, आमसभेत ग्रामस्थांनी गैरप्रकाराची चौकशी व्हावी, या मागणीचा पाठपुरावा केला. एक वर्षापूवी खा. रामदास तडस, जि.प. सदस्य राना रणनवरे यांनी जाहीर सभेत गैरप्रकाराची १५ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले; पण अद्यापही चौकशीला सुरूवात झाली नसल्याचे दिसते. या सर्व बाबी ग्रा.पं. सरपंच व सचिवांच्या लक्षात असताना कंत्राटदाराची अंतिम देयके अदा करण्यात आली. यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहे. सतत पाठपुरावा करूनही चौकशी का होत नाही, देयक कसे देण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)