शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती आणि प्रतिरोधातूनच हिवतापावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेपर्यंत किटकजन्य आजाराची जनजागृती व संदेश पोहोचविण्याकरिता आरोग्य खात्यामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजागतिक हिवताप दिन : यंदाचे घोषवाक्य ‘तयारी हिवतापास हरविण्याची’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेपर्यंत किटकजन्य आजाराची जनजागृती व संदेश पोहोचविण्याकरिता आरोग्य खात्यामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुल येथून होणार आहे. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करून बापूकुटी परिसर सेवाग्राम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.‘तयारी हिवतापास हरविण्याची’ या वर्षाच्या घोषवाक्यानुसार प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. हिवतापावर मात करावयाची असेल तर शासकीय यंत्रणेसोबतच जनतेचा प्रभावी सहभाग घेणे गरजेचे असल्याने या मोहिमेची सविस्तर माहिती करून घेणे आवश्यक आहे.डासांमार्फत प्रसारित होणारे प्रमुख रोग म्हणजे हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया डेंग्यू व जापनिज एन्सेलायटीस (जेई) हे आहेत. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या प्रसार डासांमार्फत होत असतो. हिवताप व डासांपासून होणाऱ्या इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. हिवताप नियंत्रण ही एकट्या शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात १६८ रक्त नमुुने दूषित आढळले आहे. त्यामुळे गंभीरता अधिक आहे. तद्वतच किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जनतेचा सहभाग आणि सहकार्य घेण्याचे दृष्टीने दरवर्षी जून महिना ‘हिवताप विरोधी जनजागरण महिना’ म्हणून साजरा होतो. जून महिन्यात मानसूनचे आगमनासोबतच सर्वत्र डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते. या आजारावर मात करण्यासाठी शासन सर्वस्तरावर प्रयत्नशिल असते. शासनाच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे. लोकसहभाग मिळण्यावरच लोकांच्या वर्तणुकीत बदल घडवून त्यांचे चांगल्या सवयीत रूपांतर करून आजारास प्रतिबंध करता येवू शकेल.‘डासांपासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण’प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जाते. यात प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देवू नये, खड्डे बुजवावे. साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोपत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्यांचा वापर करावा, संडासचे व्हेट पाईपला घरगुती कापड बांधावा व ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत रक्त नमुना तपासून घ्यावा, ‘डासांपासून संरक्षण, हिवतापासून रक्षण’ या उक्तीप्रमाणे हिवताप नियंत्रण सुद्धा माणसाच्याच हातात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य