शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या दबावतंत्राचा ‘दीपाली’ ठरली बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:27 IST

नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते.

ठळक मुद्देमृताच्या आईचा आरोप : अग्रगामी हायस्कूलमधील प्रकार, योग्य कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते. त्यांच्या याच दबावाला कंटाळून तिने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला. दीपाली ही अग्रगामी हायस्कूलमधील हेकेखोरवृत्तीच्या शिक्षकांच्या दबावतंत्राचा बळी ठरल्याचा आरोप दीपालीची आई रश्मी जानवे यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक मुख्य मार्गालगत रहिवासी असलेली दीपाली जानवे हिचे प्राथमिक शिक्षण अग्रगामी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. सध्या ती तेथे नववीचे शिक्षण घेत होती.सदर घटनेच्या काही दिवसांपूर्वी अग्रगामी शाळेत पालक सभा घेण्यात आली. यावेळी जे विद्यार्थी शाळेच्यावतीने घेण्यात येणाºया परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा जोसेफ यांच्या सूचनेवरून शाळेतील शिक्षकांनी ‘जर तुमच्या पाल्याने पुढील परीक्षेत ५० टक्क्यांच्यावर वर गुण घेतले नाही तर तुम्हाला तुमच्या पाल्याची टीसी देण्यात येईल’ अशा आशयाचा मजकूर पालकांकडून लेखी घेतला. यात मृतक दीपालीच्या पालकाचाही समावेश होता. त्यामुळे दीपाली ही काही दिवसांपासून अतिशय तणावात होती.अशातच नववीचे शिक्षण घेण्याºया दीपाली हिने गुरूवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपालीच्या आत्महत्येस शिक्षकांचे दबावतंत्र जबाबदार असून या प्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी मृत दीपालीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.अन्य उपक्रमात राहायची पुढेशाळेच्यावतीने घेण्यात येणाºया सांस्कृतिक, खेळ स्पर्धा आदी उपक्रमात दीपाली ही स्वयंस्फूर्तीने भाग घेत होती. तिने आतापर्यंत कुठले असे मोठे पारितोषिक पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पदच होता, असे सांगण्यात आले.शाळेला दिली सुटीदीपालीच्या आत्महत्येची वार्ता शाळेतील शिक्षकांना मिळताच शुक्रवारी शाळेला सुटी देण्यात आली होती.शाळेत पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत कमी गुण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी मजकूर घेण्यात आला होता, हे जरी खरे असले तरी तो केवळ पालकांनी आपल्या पाल्याबाबत जागरूक व्हावा यासाठी होता. पूर्वीचा अभ्यासक्रम बदलला असून आता १०० गुणांसाठी विद्यार्थ्यांना लिहावे लागते. जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर आहेत, त्यांच्यासाठी शाळेच्यावतीने अतिरिक्त विशेष वर्ग घेतले जातात. आम्ही चांगला विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न करतो.- दीपा जोसेफ, मुख्याध्यापिका, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).दीपाली जानवे ही विद्यार्थिनी अभ्यासात कमजोर असली तरी ती शाळेच्यावतीने आयोजित करण्यात येणाºया इतर उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत होती. तिने आतापर्यंत कुठलेही बक्षीस पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पद होता.- डी. जी. मेहरे, वर्ग शिक्षक, अग्रगामी हायस्कूल, पिपरी (मेघे).

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू