शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कर्जमुक्ती हा दिलासा देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापनदिन सोहळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ठळक मुद्देपालकमंत्री : विविध ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अतिशय वाईट परिस्थितीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमुक्ती देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच शेतकऱ्याला अधिक बळकट करणे तसेच आणखी सवलती देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने हे सरकार अग्रणी राहणार आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापनदिन सोहळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि. प.अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. केदार यांनी परेड निरीक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहीदांना अभिवादन केले. याप्रसंगी गृहविभाग, गृहरक्षक, एन.सी.सी., स्काऊटस्-गाईडस् पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड योजनेवर उत्कृष्ट झाकी, आपात कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्याच्या हस्ते शहीद जवान प्रेमदास मेंढे यांच्या परिवाराला २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेल्या आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी) ग्रा. पं.ला पाच लाखांचा प्रथम, हिंगणघाट तालुक्यातील जांगोणा ग्रा.पं. ला तीन लाखांचा द्वितीय तर काचनगाव ग्रा.पं.ला दोन लाखांचा तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर उल्लेखनीय कामाबद्दल मोहीत सहारे व आंकाशा काकडे यांना १० हजार रुपये आणि अध्ययन भारती संस्थेला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वयोवृद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू जानराव लोणकर यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुका जिल्हा प्रशासनाने शांत व निभर्य वातावरणात पार पाडल्याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचा सन्मानचित्र देऊन सत्कार करण्यात आला. स्काऊटस्- गाईडस्च्या साक्षी चौधरी, शासकीय उत्कृष्ट कामगिरी बाबत जलसंपदा विभागाचे कर्मचारी साहेबराव गोडे, गुणवत्त खेळाडू श्रद्धा जनार्धन शिरपूरकर, पुजेश नितीन डफळे, राजेश उमरेही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. संचालन अतुल राजपायले यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी