लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : नागपूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसने वृद्धाला धडक दिली. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी येथील बसस्थानकासमोर घडला. रामभाऊ नारायण कामडी (७०) रा. परसोडी, असे मृतकाचे नाव आहे.रामभाऊ हे त्यांचा मुलगा विलास ग्रामीण रुग्णालयात भरती असल्याने त्याचा डबा आणून देण्यासाठी परसोडी येथून कारंजा येथे आले होते. डबा दिल्यानंतर ते गावाला जाण्यासाठी बसस्थानकावर येत होते. ते महामार्ग ओलांडताना शिवशाही बस क्र. एमएच ०९ ईएम १८७२ च्या चालकाचे लक्ष विचलित झाले व बसची वृद्धास जबर धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गोंधळलेल्या चालकाने बस जागेवर न थांबविता एक किमी अंतरावर टोल नाक्याजवळ थांबविली. घटनेची पोंलिसांनी नोंद घेतली.
शिवशाहीच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:33 IST