शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दिवसाही होतेय रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:48 IST

घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

ठळक मुद्देएका रॉयल्टीवर चार ट्रिपा : संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय टेकोडाचे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी तक्रारही केली आहे.यंदा आष्टी तालुक्यात इस्माइलपूर या एकाच रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्याला लागून अमरावती जिल्ह्यातील जावरा रेतीघाट लिलाव झाला असून घाट सुरूही झाला आहे. बांधकामे झपाट्याने सुरू असल्याने रेतीघाट धारकांनी एक रॉयल्टी देत त्यावर चार वेळा रेतीची वाहतूक करण्याची अट घालण्यात आली आहे. प्रती ट्रीप ३ हजार ५०० रुपये दर आकारण्यात आले आहेत. परिणामी, रेतीची तस्करी बिनदिक्कत दिवसरात्र सुरू आहे. तहसील कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. रेतीची चोरी पकडण्यासाठी भारसवाडा येथील तलाठ्याने सक्तीची रॉयल्टी तपासणी सुरू केली होती; पण या कर्तव्यदक्ष कर्मचाºयाला वरिष्ठ अधिकाºयांनी रॉयल्टी तपासू नका, घाटधारकावर मेहरबानी करा, असा उपटसुंभ सल्ला दिला आहे. यामुळे प्रशासन एवढे मेहरबान कसे, हा प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे.घाटातून रेती भरण्यासाठी सध्या मनुष्यबळाचा वापर होत आहे. दिवसभर १०० च्या वर ट्रॅक्टर, २५ डंपर यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. शासनाने लिलावाचे दर ठरवून देण्यासोबतच एक ब्रास रेती कितीला विकायची, याचीही अट घालून दिली आहे; पण नियम धाब्यावर बसवून सर्रास लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून रातोरात अधिक लखपती बनण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महसूल चोरी प्रकरणातील दंड आकारण्याचे प्रमाणही घटले आहे. रेतीचोरी पकडण्यासाठी पथक नेमण्याऐवजी त्याला अभय दिले जात असल्याचे दिसते. यामुळे गोदावरी, वाघोली, खडकी, टेकोडा येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत. टेकोडा ग्रा.पं. चे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.महसूल विभागाचे धाडसत्र कुठेही कार्यरत नाही. यामुळे चार तलाठी, दोन नायब तहसीलदार यांचे नेमलेले पथक गेले कुठे, असा प्रश्नही कुरवाडे यांनी उपस्थित केला आहे. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. रेतीची दिवसाला होणारी सर्रास चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना देण्यात आल्या आहेत.अन्य घाटांमध्ये बोटींचा वापरघाटांतून रेतीचा उपसा करण्याकरिता यंत्रांचा वापर करू नये, असे नियम सांगतात; पण या नियमांना पदोपदी पायदळी तुडविण्याचे काम घाटधारक करीत असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यात नसल्या तरी समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यात सर्रास बोटींचा वापर करून रेतीचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील घाटातून तर मोठ्या प्रमाणात बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.