शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे १० गावांत काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:14 IST

सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने....

ठळक मुद्देसोसाट्याचा वारा येताच महावितरणचे पितळ उघडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने तब्बल १० गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथे काळोखाची स्थिती असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.बंद पडलेला पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरणची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात त्यांना अपयश आल्यास या भागातील नागरिकांना रात्र अंधरात काढावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वर्धा शहरासह आसपासचा परिसर अंधारात गेला आहे. या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर आणि परिसराला वीज पुरवठा करणारी महापारेषणची भूगाव- देवळी १३२ के व्ही. वाहिनी बंद पडली. परिणामी महावितरणच्या देवळी, भिडी, अडेगाव, सावंगी, मदनी, खरंगणा (गोड)े, म्हाडा कॉलनी, विद्युत भवन, वायफळ, वायगाव येथील वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद झाला. याचा फटका या भागातील सुमारे ५० हजार वीज ग्राहकांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे यांनी हालचाल करून पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. वर्धा शहराला सेलू येथून तर मदनी, खरांगणा या उपकेंद्रावरील वीज ग्राहकांसाठी सेवाग्राम येथून वीज पुरवठा घेण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहे.आकोली येथे वीज कोसळलीजिल्ह्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यात बऱ्याच ठिकाणी पावसासह सोसाट्याचा वारा आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आकोली परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. याच वेळी सुधाकर सायरे यांच्या शेतात वीज कोसळली. यात दोन गाई व एक गोऱ्हा ठार झाला. यासह चिकणी (जामणी ) परिसरात पावसासह असलेल्या वादळाने चांगलेच नुकसान केले.

टॅग्स :Rainपाऊस