शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

दहेगाव पोलिसांची आरोपीस मारहाण

By admin | Updated: May 12, 2014 00:04 IST

कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे (२४) यास दहेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत ठाणेदाराचा रायटर शिपाई रवींद्र याने जबर मारहाण केली.

सेलू : कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे (२४) यास दहेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत ठाणेदाराचा रायटर शिपाई रवींद्र याने जबर मारहाण केली. पवन यास रविवारी सेलू येथील न्यायालयात हजर केले असता त्याने न्यायदंडाधिकार्‍यांकडे मारहाणीबाबत तक्रार केली़ न्यायालयाने दखल घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. सेलू येथे वैद्यकीय तपासणी केली असता त्याचे दोन्ही हात, पाठ व कंबरेखाली जबर मार असल्याचे आढळून आले. कोपरा येथील पवन उर्फ गोलू अरुण फसाटे यास अपराध केला नसताना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दहेगाव पोलिसांनी त्याच्या घरून पोलीस ठाण्यात आणले. त्याने मी कोणता गुन्हा केला, असे पोलिसांना विचारले असता तू ठाण्यात चल मग, सांगतो, असे म्हणत ठाण्यात आणले. तेथे रात्रभर ठेऊन शनिवारी सकाळी शिपाई रवींद्र याने पवनला टेबलवर झोपवून पट्ट्याने बेदम मारहाण केली. यात त्याचे दोन्ही हात, पाठ व कंबरेच्या खाली दुखापत झाली़ शिवाय मारहाणीचे वळ दिसत आहेत़ केवळ मारहाणच केली नाही तर त्याच्यावर दारूचे खोटे गुन्हेही दाखल केले़ त्याच्याकडून पाच लिटर दारू जप्त केल्याचे दाखविण्यात आले. पवनला शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ठाण्यात आणले; पण अटक शनिवारी दाखवित न्यायालयात रविवारी हजर केले. न्यायाधीशांसमोर त्याने पोलिसांच्या कारवाईचा पाढाच वाचला़ अंगावरील मारहाणीचे वळ व त्याची तक्रार पाहता सेलू येथील सहदीवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी शहजाद परवेज यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा हादरली़ दहेगाव पोलीस ठाण्याची गाडी लगेच सेलू ग्रामीण रुग्णालयात धडकली आणि डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला़ सध्या दहेगाव पोलीस ठाण्याचा कारभार विचित्र आहे़ कर्मचार्‍यांवर ठाणेदारांचा वचक नसल्याचेच यावरून दिसून येते.(तालुका प्रतिनिधी)