शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धामच्या पाण्याची पळवा-पळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मिळतोय खरांगणा (मो.) मध्ये थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नागरिकांना सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३१ हजारांच्यावर कुटुंबियांना धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वर्धा नगर परिषद प्रशासन काही प्रमाणात दिलासा देत आहे. असे असले तरी सध्या धामच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून काही पुढारी बनवा-बनवी धोरण अवलंबत आहेत. याच संधीचे सोनकरून काही जण धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पळवा-पळवी करीत असल्याचे बघावयास मिळते.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक दिवशी धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून सुमारे ३२ एमएलडी पाण्याची उचल करून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १५ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहराशेजारी असलेल्या सुमारे १३ गावांमधील १६ हजारांच्यावर कुटुंबियांना करते. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने सध्या भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना धाम मधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने न.प. प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. परंतु, दुसरी बाजू लक्षात घेतली असता सध्या वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महिन्यातून एकदाच धाम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. अशातच खरांगणा (मोरांगणा) परिसरात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अडविल्या जात असल्याने सध्या वर्धा शहरानजीकच्या पवनार व येळाकेळीपर्यंत कमी पाणी पोहोचत आहे. पूर्वीच धाम प्रकल्पात नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. शिवाय इतर लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सुमारे १५ दिवस सुकळी प्रकल्पाने वर्धेकरांची तहाण भागविली. अशातच पाण्याची अडवणूक होत असल्याने संंबंधित प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी