शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रुख्मिणीनगरात सिलिंडरचा स्फोट; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:19 IST

भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देपरिसरात खळबळ : संसारोपयोगी साहित्याचा कोळसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंदी (मेघे) भागातील रुख्मिणीनगरातील गुंडतवार यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या जयस्वाल यांच्या घरात अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली असून अक्षय गुंडावार (२६) व तेजस पोहाणे (२०) असे जखमींची नावे आहे.प्राप्त माहितीनुसार, रुख्मिणीनगर येथील अमर जयस्वाल यांच्या घरी आग लागल्याची माहिती मिळताच अक्षय गुंडावार व तेजस पोहाणे हे अमर जयस्वाल यांच्या पत्नीला मदत करण्यासाठी गेले. दरम्यान अमर जयस्वाल यांच्या पत्नी व मुलगा हे दोघे घराबाहेर पडले. याचवेळी आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले. दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात अक्षय व तेजस गंभीर जखमी झाले. जोरदार आवाज झाल्याने दुपारच्यावेळी विश्राती घेत असलेले परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या भीमराव येडमे, सेवक लोहवे व रामभाऊ प्रधान यांनी अग्निशमनबंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर चंदेल, दिनेश चव्हाण, कैलास पेटकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली असून ही आग घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस गळतीने लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत भाडेकरू जयस्वाल व घरमालक गुंडावार यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.अन् भीतीपोटी घराघरातील गॅस सिलिंडर निघाले बाहेरजोरदार आवाज झाल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरातील सिलिंडर घराबाहेर काढले होते. इतकेच नव्हे तर घटनेच्यावेळी जयस्वाल यांच्या घरात एक आणखी भरलेले सिलिंडर होते. परंतु, आगेवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :fireआग